भारतीय विमान पाकिस्तानात उतरताच जेवणात मिसळलं विष… पाकचा विकृतीचा कळस; पाकिस्तानी लष्कर तणावात

भारत आणि पाकिस्तान यांच्या नात्यात कायमच तणाव बघायला मिळालाय. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये गेला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती.

भारतीय विमान पाकिस्तानात उतरताच जेवणात मिसळलं विष... पाकचा विकृतीचा कळस; पाकिस्तानी लष्कर तणावात
Indian Airlines plane
| Updated on: Oct 30, 2025 | 10:50 AM

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावात राहिली आहेत. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने आपल्या वेळापत्रकानुसार मुंबईसाठी उड्डाण केली. या विमानात 83 पॅसेंजर आणि क्रू मेंबर उपस्थित होती. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना अचानक हे विमान मुंबईऐवजी पाकिस्तानच्या दिशेने नेण्यात आले. पाकिस्तानी सरकार आणि तेथील लष्कराला या विमानाबाबत काहीच माहिती नव्हती. पायलटने गुपचूप कंट्रोलला मेसेज करत विमान पाकिस्तानात जात असल्याची माहिती दिली आणि एकच गोंधळ भारतात बघायला मिळाला. दोन्ही पायलटच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यात आली होती. ही घटना 10 सप्टेंबर 1976 ची आहे.

उड्डाण केल्यानंतर विमान हे आपल्या निश्चित उंचीवर जाऊन पोहोचल्यानंतर चार जण अचानक विमानात उभी राहिली आणि कोणाला काही कळण्याच्या आत विविध कोपऱ्यात पसली. त्यामधील दोन जण थेट कॉकपिटमध्ये शिरले आणि त्यांनी कॅप्टन बीएन रेड्डी आणि सह-वैमानिक आरएस यादव यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली. विमान हाईजॅकर झाल्याचे ओरडण्यास त्यांनी सुरूवात केली आणि एकच गोंधळ उडाला.

कॅप्टन रेड्डी यांनी परिस्थिती चांगली हाताळत थेट गुपचूप एटीसीला मेसेज केला आणि सांगितले की, विमान हायजॅक झाले असून पाकिस्तानमध्ये उतरवले जातंय. हायजॅकरने हे विमान पाकिस्तानमध्ये उतरवण्यासाठी पायलटवर दबाव टाकला.  मेसेज मिळताच भारताची सुरक्षा यंत्रणा हादरली आणि संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय सक्रिय झाले. त्यादरम्यानच इंडियन एअरलाइन्सचे विमान थेट कराचीत उतरले.

पाकिस्तानच्या कराची विमानतळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आणि पाकिस्तानी लष्कराने वेढा घातला. भारताने पाकिस्तानवर दबाव टाकत स्पष्ट केले की, एकाही प्रवाशाला काही झाले तर सोडणार नाही. यानंतर पाकिस्तानी लष्कराने हायजॅकर यांच्यासोबत संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन देखील दिले. मात्र, ही पाकिस्तानने भारताच्या दबावापुढे चाल खेळली.

हायजॅकरला पाकिस्तानी लष्कराने इतके विश्वासात घेतले की, त्यांनी विमानातील हायजॅकरला बिर्यानी ज्यूस आणि  कोल्ड ड्रिंक पिण्यासाठी पाठवले. विशेष म्हणजे त्यांनी देखील हे आनंदाने खाल्ले आणि तिथेच सर्वकाही फसले. बिर्याणीमध्ये आणि कोल्ड ड्रिंकमध्ये बेशुद्ध पडण्याच्या गोळ्या घातल्या होत्या. हे खाऊन हायजॅकर बेशुद्ध झाले आणि पाकिस्तान लष्कराने विमानाचा ताबा घेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भारताचे हे विमान दुसऱ्यादिवशी अर्थात
11 सप्टेंबर 1976 ला सर्व प्रवाशांना विमानासह सुखरूप परत पाठवले.