Pulwama Attack: भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत: डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट आहे. पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी होत आहे. त्यातच भारताने पाकिस्तानविरुद्ध चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अशावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठी भीती व्यक्त केली आहे. दोन्ही देशातील तणाव अत्यंत खतरनाक असल्याचं ट्रम्प म्हणाले. भारत काहीतरी मोठं पाऊल टाकण्याच्या …

Pulwama Attack: भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत: डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट आहे. पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी होत आहे. त्यातच भारताने पाकिस्तानविरुद्ध चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अशावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठी भीती व्यक्त केली आहे. दोन्ही देशातील तणाव अत्यंत खतरनाक असल्याचं ट्रम्प म्हणाले. भारत काहीतरी मोठं पाऊल टाकण्याच्या विचारात आहे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. शिवाय पाकिस्तानची 130 कोटी डॉलरची मदतही रोखल्याचं यावेळी ट्रम्प यांनी सांगितलं.

ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधील ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानमध्ये सध्या अत्यंत तणावाची स्थिती असल्याचं नमूद केलं.

“सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान काहीतरी भयंकर घडत आहे, दोन्ही देशांमध्ये सध्या प्रचंड तणाव असून, अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. अनेक लोकांचा जीव गेलाय, हे सर्व थांबावं अशी आमची इच्छा आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

याशिवाय भारत काहीतरी अत्यंत कठोर (Very strong) करण्याच्या तयारीत आहे, असंह त्यांनी सांगितलं.

“भारत काहीतरी कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. भारताने नुकतंच 50 जणांचा जीव गमावला आहे, त्याबाबत अनेकजण बोलत आहेत.मात्र सध्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. काश्मीरमध्ये जे काही घडलं, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ते घातक आहे”, असं ट्रम्प म्हणाले.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फ्रेबुवारीलाा झालेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी झालेल्या चकमकीत एका मेजरसह पाच भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जैशचा प्रमुख कुख्यात दहशतवादी मसूद अजहर आहे. या सर्व परिस्थितीमुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारताने पाकिस्तानला जाणारं भारताचं पाणी रोखण्यााचा निर्णय घेतला आहे.

UNSC मध्ये हल्ल्याचा निषेध
संयुक्त राष्ट्रामध्ये पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या हल्ल्याची निंदा केली. या हल्ल्यामागे ज्यांचा हात आहे, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी असं UNSC ने नमूद केलं.

पाकिस्तानी उच्चालयाबाहेर निदर्शने
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वंशाच्या नागरिकांनी अमेरिकेतील न्यूजर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये निदर्शने केली. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर कारवाई करावी, अशी मागणी या नागरिकांनी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *