AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा मुस्लीम देश भारतासोबत भागीदारी करण्यासाठी उत्सूक, चीन-पाकिस्तानला मोठा झटका

India partnrship with saudi : गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने अनेक देशांसोबत आपले संबंध चांगले केले आहेत. ज्यामध्ये अनेक मुस्लीम देशांचा देखील समावेश आहे. भारताने अनेक मोठ्या देशांमध्ये भागीदारी करण्यासाठी एक पाऊल उचललं आहे. आता आणखी एक मुस्लीम देश भारतासोबत भागीदारी करण्यासाठी उत्सूक आहे.

हा मुस्लीम देश भारतासोबत भागीदारी करण्यासाठी उत्सूक, चीन-पाकिस्तानला मोठा झटका
| Updated on: Feb 08, 2024 | 9:10 PM
Share

मुंबई : गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत जागतिक स्तरावर मोठी भूमिका पार पाडत आहेत. गेल्या १० वर्षात देशाचे नाव अनेक गोष्टींच्या बाबतीत उंचावले आहे. भारत आता एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा उद्देश सरकारने ठेवला आहे. त्यामुळे भारत आता जागतिक स्तरावर देखील आपल्या मित्र देशांसोबत अनेक करार करत आहे. जगभरातील बलाढ्य आणि श्रीमंत देश भारताशी मैत्री करण्यासाठी आणि भारताचा पार्टनर होण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियासारखे शक्तिशाली देश भारताचे भागीदार बनले आहेत. यात आता आणखी एक देश सहभागी होणार आहे.

सौदी अरेबिया उत्सुक

सौदी अरेबिया देखील भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी उत्सुक आहे. सौदी अरेबिया आगामी काळात भारताचा नवा सामरिक भागीदार बनू शकतो. या दिशेने दोन्ही देशांमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसणार आहे.

भारत आणि सौदी अरेबियाने याआधी संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आणि संरक्षण औद्योगिक सहभाग, तंत्रज्ञान हस्तांतरण, द्विपक्षीय संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केलीये. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्यात मंगळवारी रियाधमध्ये चर्चा झाली. भट्ट यांनी सौदी अरेबियाचे सहाय्यक संरक्षण मंत्री खालिद अल-बायारी यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही बाजुने संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आली.

अनेक गोष्टींवर दोन्ही देशांमध्ये चर्चा

एकीकडे पश्चिमेकडील देशांमध्ये तणावाचे वातावरण असताना भारत आणि सौदी अरब यांच्यात संयुक्त प्रशिक्षण सराव, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि तज्ज्ञांची देवाणघेवाण यावर चर्चा झालीये. भट्ट हे रियाध येथे होणाऱ्या वर्ल्ड डिफेन्स शो (WDS) 2024 मध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला ४ फेब्रुवारीपासून सुरुवात झालीये.

एकीकडे पाकिस्तान भारतावर आरोप करत असताना भारताचा मात्र इतर मुस्लीम देशांसोबत वाढत असलेला व्यापार आणि मैत्री ही चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढवणारी आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.