AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सोन्याच्या ढीगाने ३२ जणांचा बळी घेतला, १२०० वर्षांपूर्वीच्या थडग्यात काय सापडले?

जगात अनेक ठिकाणी पुरात्वत विभागाची कामे सुरु आहेत. एका देशात अशाच पुरातत्व विभागाने एका १२०० वर्षे जुन्या कबरीला शोधून काढले आहे. त्या सोन्याचा प्रचंड मोठा सापडला आहे.

या सोन्याच्या ढीगाने ३२ जणांचा बळी घेतला, १२०० वर्षांपूर्वीच्या थडग्यात काय सापडले?
| Updated on: Jan 30, 2025 | 7:05 PM
Share

जगभरातील देशांमध्ये प्राचीन स्थळांवर पुरातत्व विभागाकडून खोदकाम सुरुच असते. या खोदकामात संशोधकांना अनेकदा आश्चर्यकारक वस्तू सापडत असतात. या वस्तूंवर त्याकाळी पुरातनकाळातील संस्कृती आणि लोकांच्या राहणीमानाचा अंदाज येत असतो. अशाच प्रकारचे खोदकाम एका देशात झाले आहे. येथे एका १२०० वर्षे जुन्या थडग्यातून हैराण करणाऱ्या वस्तू आढळल्या आहेत. यात खूप साऱ्या सोन्यासोबत किमान ३२ मृतदेहांचे अवशेष देखील सापडले आहेत. असे म्हटले जात आहे की हे मृतदेह बळी दिलेल्या लोकांचे आहेत. काय आहे प्रकरण पाहूयात…

मेट्रो युकेच्या बातमीनुसार हे संशोधन पनामा देशात झाली आहे. पनामा सिटीपासून सुमारे ११० मैल दूर असलेल्या एल कॅनो आर्किओलॉजिकल पार्कमध्ये झालेल्या उत्खननात सोन्याचे घबाड सापडले आहे. यात आश्चर्यकारक वस्तू सापडल्या आहेत. यात सोन्याची शॉल,बेल्ट, दागिने आणि व्हेल म्हणजे देवमाशांच्या दातांपासून बनलेले कानातील रिंगा आदी मौल्यवान आणि महागड्या प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. हे थडगे आणि वस्तू कोकल संस्कृतीच्या एका उच्च पदस्य व्यक्तीचे असून त्याच्या मृतदेहाचे येथे दफन झाले होते. समुदाय प्रमुखाच्या मृत्यूनंतरचे जीवन आरामात जावे यासाठी ३२ लोकांचा बळी देण्यात आला आहे. मृतदेहांची संख्या नेमकी किती होती याचे संशोधन सुरुच आहे. पनामाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या लिनेट मोंटेनेग्रो यांनी सांगितले की या खजान्याची किंमत खूप जादा आहे.

काय काय सापडले ?

असे मानले जाते की हे थडगे किंवा कबर इसवी सन ७५० मध्ये एका उच्च पदस्य नेत्यासाठी बनविली होती. त्याला एका महिलेच्या मृतदेहावर दफन केले होते. त्याकाळी अभिजात वर्गातील लोकांना दफन करण्याची प्रथा होती. कब्रमध्ये आढळलेल्या अन्य वस्तूत बांगड्या, मानवी आकृतीच्या झुमके, मगरीचे मृतदेह, घंट्या, कुत्र्‍यांच्या दातापासून तयार केलेले स्कर्ट, हाडांपासून तयार केलेली बांसूरी आणि चीनी माती अशा वस्तू सापडल्या आहेत. एल कॅनोमध्ये साल २००८ पासून खोदकाम सुरु आह्.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.