AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | सबका हिसाब होगा, इस्रायलची ‘निली’, काय आहे हे?

Israel-Hamas War | दोन आठवड्यांपूर्वी 7 ऑक्टोबरला इस्रायलने इतिहासातील भीषण दहशतवादी हल्ल्यााचा सामना केला. अनेक निष्पाप इस्रायली नागरिक मारले गेले. आतापर्यंत कधी इतका मोठा हल्ला इस्रायलवर झाला नव्हता. इस्रायल आता या सगळ्याच हिशोब चुकता करणार आहे.

Israel-Hamas War | सबका हिसाब होगा, इस्रायलची 'निली', काय आहे हे?
Israel-Hamas war
| Updated on: Oct 23, 2023 | 3:12 PM
Share

जेरुसलेम : इस्रायलच्या इतिहासातील त्यांच्यावर सर्वात क्रूर हल्ला शनिवार 7 ऑक्टोबरला झाला. याआधी इस्रायलने अनेक युद्ध लढली, दहशतवादी हल्ले झेलले. पण इतक्या मोठ्या प्रमाणात क्रूरता त्यांच्याबरोबर कधी झाली नव्हती. त्या दिवशी दक्षिण इस्रायलमध्ये जे झालं, त्याच्या आठवणींनी आजही अनेक इस्रायलींच्या काळजाचा थरकाप उडतो. नुकतीच जन्मलेली बाळं, लहान मुलं, महिला, वयोवृद्ध नागरिक यांच्यावर भयंकर अत्याचार झाले. हमासच्या दहशतवाद्यांनी अक्षरक्ष: नरसंहार केला. त्यामुळे आज प्रत्येक इस्रायली नागरिकाच्या मनात प्रचंड संताप आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. इस्रायल पृथ्वीवरच एक असा देश आहे, जे ठरवतो ते करतो. एखाद्या छोट्याशा जिल्हााएवढा हा देश एकाचवेळी सात देशांना भिडलाय. महत्त्वाच म्हणजे हे युद्ध त्यांनी जिंकलंसुद्धा.

इस्रायलने आतापर्यंत त्यांच्यावर केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलय. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना परदेशात जाऊन संपवलय. त्यामुळे 7 ऑक्टोबरच्या कारस्थानामागे जे कोणी आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष हल्ले केले, त्यातला एकही जण सुटणार नाही. इस्रायलने तशी घोषणाच केलीय. आता इस्रायलने योजनेच्या प्रत्यक्ष अमलबजावणीला सुरुवात केलीय. कारण हमासच्या हल्ल्याने इस्रायलची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. मोसाद प्रमाणे इस्रायलमध्ये आणखी एक गुप्तचर यंत्रणा आहे, शीन बेट. या शीन बेटने एका नव्या युनिटची उभारणी केलीय. 7 ऑक्टोबरच्या क्रूर हल्ल्यामागे जे कोणी आहेत किंवा प्रत्यक्ष ज्यांनी हल्ला केला, त्या प्रत्येकाला संपवण हा स्पेशल युनिटचा एकमेव उद्देश असेल. कोण रडारवर असेल?

शीन बेटने या स्पेशल युनिटला ‘निली’ हे नाव दिलय. ‘निली’ हा एक हिब्रू शब्द आहे. दक्षिण इस्रायलच्या हल्ल्यामध्ये जे कुणी आहे, त्यांना शोधून संपवण हेच ‘निली’च एकमेव काम आणि उद्देश असेल. हमासची जी कमांडो युनिट आहे नुखबा, त्यांना टार्गेट करण ही निलीवर जबाबदारी आहे. हमासच्या याच कमांडो युनिटने दक्षिण इस्रायलनेमध्ये नरसंहार केला होता. ‘निली’चा कारभार स्वतंत्रपणे चालेल. मोस्ट वाँटेड दहशतादी या युनिटच्या रडारवर असतील.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?