AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! युद्ध थांबलं, थेट डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; संपूर्ण जगाने सोडला सुटकेचा निश्वास!

Trump Tweet on War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित केले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

मोठी बातमी! युद्ध थांबलं, थेट डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; संपूर्ण जगाने सोडला सुटकेचा निश्वास!
डोनाल्ट ट्रम्पImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 23, 2026 | 6:18 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणशी संबंधित युद्धाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. मध्य पूर्वातील सध्याच्या संघर्षाबाबत इराणशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले असून, युद्ध पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय, त्यांनी इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित केल्याची घोषणा केली आहे. ट्रंप यांच्या या वक्तव्यामुळे युद्ध आता हळूहळू शांततेकडे वळत असल्याचे संकेत मिळत आहेत.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की गेल्या दोन दिवसांत संयुक्त राज्य अमेरिका आणि इराण यांच्यात खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. ही चर्चा मध्य पूर्वातील आमच्या संघर्षाचे पूर्ण समाधान काढण्याशी संबंधित आहे. या सखोल, विस्तृत आणि रचनात्मक चर्चेच्या वातावरणामुळे, जी संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे, मी युद्ध विभागाला आदेश दिला आहे की इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व सैन्य हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करावेत. हा निर्णय सुरू असलेल्या बैठका आणि चर्चेच्या यशावर अवलंबून असेल.”

ट्रंप यांच्या या घोषणेनंतर इराणकडून काय प्रतिक्रिया आली?

ट्रंप यांच्या या पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये असलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते इब्राहीम रेजाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “लढाई सुरूच आहे आणि ही शत्रूसाठी आणखी एक पराभव आहे. ट्रंप आणि अमेरिका पुन्हा एकदा पराभूत झाले आहेत.” इराणकडून आलेली ही प्रतिक्रिया ट्रंप यांना उत्तेजित करणारी आहे. इराणने हे स्पष्ट केले आहे की पडद्यामागे किंवा प्रत्यक्षरित्या अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ट्रंप यांचे हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. इराण हे पाऊल अमेरिकेने आपल्यासमोर गुडघे टेकले असल्याचे सांगत आहे. या घडामोडींमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली असून, इराणच्या शेजारील देशांमध्येही काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!