टॅरिफ वॉरमध्ये चीनची अमेरिकेसमोर शरणागती, सर्वच टॅरिफ परत घेण्याची विनंती
चीनने दुसरीकडे अमेरिकन टॅरिफविरोधात आवाज उठवण्याचे अपील केले आहे. अमेरिकेने आर्थिक हुकमशाही सुरु केली आहे. आम्ही त्यांच्याविरोधातील टॅरिफ वॉरमध्ये विजयी होऊ. अमेरिकेने चीनच्या हितसंबंधांना बाधा पोहचवली तर त्यांना जसेच्या तसे उत्तर दिले जाईल, असे चीनने म्हटले आहे.

Trump tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरु केले आहे. या टॅरिफ वॉरविरोधात चीनने बंड पुकारले होते. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफला जसेच्या तसे उत्तर चीनने दिले होते. त्याचे परिणाम चीनमध्ये दिसू लागले आहे. चीनमधील शंघाई आणि ग्वांगडोंगसह अनेक निर्यात केंद्रांवर अन् बंदरांवर निर्यात मंदावली आहे. अमेरिकेतून येणारी आयात ठप्प झाली आहे. यामुळे चीनमधील कारखान्यांनी उत्पादन थांबवले आहे. त्यानंतर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेसमोर शरणागती पत्कारली आहे. सर्व सामानांवर लावण्यात आलेले रेसिप्रोकल टॅरिफ रद्द करण्याची मागणी चीनकडून करण्यात आली आहे.
एएफपीच्या रिपोर्टनुसार, चीनने अमेरिकाला आपली चूक सुधारावी आणि रेसिप्रोकल टॅरिफ माघारी घ्यावे, अशी विनंती केली आहे. अमेरिकेने पुन्हा जुन्या मार्गावर आले पाहिजे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्ताने सांगितले की, वाघाच्या गळ्यात घंट ज्याने बांधली आहे, तोच ती काढू शकतो. डोनाल्ड ट्रॅम्पच टॅरिफ वॉर संपवू शकतात. चीनच्या सामानांवर अजूनही 145 टक्के टॅरिफ आहे. त्यानंतर चीनने शुक्रवारी अमेरिकन सामानांवर असणारे 84 टक्के टॅरिफ वाढवून 125 टक्के केले आहे.
चीनचे पुन्हा अपील
चीनने दुसरीकडे अमेरिकन टॅरिफविरोधात आवाज उठवण्याचे अपील केले आहे. अमेरिकेने आर्थिक हुकमशाही सुरु केली आहे. आम्ही त्यांच्याविरोधातील टॅरिफ वॉरमध्ये विजयी होऊ. अमेरिकेने चीनच्या हितसंबंधांना बाधा पोहचवली तर त्यांना जसेच्या तसे उत्तर दिले जाईल, असे चीनने म्हटले आहे.




ट्रॅम्प यांची चीनवर टीका
डॉनाल्ड ट्रॅम्प यांनी टॅरिफ वॉरबाबत पुन्हा म्हटले की, ज्या देशांनी अमेरिकेसोबत व्यापाऱ्यात नुकसान केले आहे, त्या कोणत्याही देशांना आम्ही सोडणार नाही. विशेषत: चीनने दीर्घ काळापासून आमच्याशी वाईट व्यवहार केला आहे. आम्ही कोणत्याही देशाला टॅरिफमध्ये सूट देणार नाही. जी लोक टॅरिफमध्ये सवलत मिळणार आहे, अशी अफवा पसरवत आहे, त्यांनाही माहीत आहे की असे काहीच होणार नाही. आम्ही चीनसारख्या देशांवर विश्वास ठेऊ शकत नाही, असे ट्रॅम्प यांनी म्हटले आहे.