AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जपानमध्ये हाहाकार! भूकंपानंतर त्सुनामीचा कहर, किनार्‍यावर उंचच उंच लाटा… समुद्रात जहाजे कोलमडली

Tsunami Alert in Japan : भूकंपाच्या धक्क्यानंतर जपानमध्ये त्सुनामीचा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. काही भागांमध्ये सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. मियाको बंदरात सुमारे 80 सेंटीमीटर उंचीची सुनामीची लाट नोंदवली गेली आहे.

जपानमध्ये हाहाकार! भूकंपानंतर त्सुनामीचा कहर, किनार्‍यावर उंचच उंच लाटा... समुद्रात जहाजे कोलमडली
Japan Tsunami AlertImage Credit source: Google
| Updated on: Apr 20, 2026 | 5:43 PM
Share

जपानमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिक्टर स्केलवर याची तीव्रता 7.4 इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचे केंद्र सानरिकु किनाऱ्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर समुद्रात होते. तसेच भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाच्या या धक्क्यानंतर जपानमध्ये त्सुनामीचा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही भागांमध्ये सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. मियाको बंदरात सुमारे 80 सेंटीमीटर उंचीची सुनामीची लाट नोंदवली गेली आहे, होक्काइडो आणि इवाते या भागातील किनाऱ्यावरील लाटांची उंची वाढण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे, त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

हाय अलर्ट जारी

जपानच्या सरकारी वाहिनी एनएचकेने दिलेल्या माहितीनुसार, हवामान तज्ज्ञांनी जपानच्या मुख्य बेटाच्या उत्तरेकडील भागातील आओमोरी प्रांताच्या किनाऱ्यापासून सुमारे 50 किमी अंतरावर सुनामीची नोंद केली आहे. यामुळेच देशातील किनाऱ्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सुनामीच्या इशाऱ्यानंतर समुद्राचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये जहाजे किनाऱ्याकडे धावताना दिसत आहेत.

जपानमध्ये आज झालेल्या भूकंपानंतर अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्थानिक शास्त्रज्ञ ओनागावा अणुऊर्जा केंद्राची तपासणी करत आहेत, या ठिकाणी कोणतीही असामान्य स्थिती आहे का हे तपासले जात आहे. अशातच जपानच्या पंतप्रधान सना ताकाएची यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या संकटकाळात शांतता आणि संयम ठेवावा अशी विनंतीही केली आहे.

जपानमध्ये जास्त भूकंप का होतात?

जपानमध्ये यावर्षी 3 असे भूकंप झाले आहेत, ज्यांची तीव्रता 6 रिश्टर स्केलपेक्षा जास्त होती. 2025 मध्ये जपानमध्ये 1500 पेक्षा अधिक भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते. त्यामुळे तुमच्याही मनात असा प्रश्न उपस्थित झाला असेल की, जपानमध्ये इतके भूकंप का होतात? याचे उत्तर म्हणजे, प्रत्यक्षात जपान चार मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्सवर वसलेला देश आहे आणि तो प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायर या भागाचा एक हिस्सा आहे. या भागात पृथ्वीखालील प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात, त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात भूकंप होत असतात.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला