AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतापासून 4000 किलोमीटर दूर आहे तुर्की, तरीही का बनला आपला दुश्मन ?

तुर्कीची सीमा भारताला लागून नाहीए, तरीही भारतापासून ४००० किलोमीटर दूरवर असलेला तुर्की आपला दुश्मन का बनला आहे ? पाकिस्तानला तुर्कीसारखी मदत का करत आहे ?

भारतापासून 4000 किलोमीटर दूर आहे तुर्की, तरीही का बनला आपला दुश्मन ?
| Updated on: May 14, 2025 | 8:05 PM
Share

काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात झालेल्या संघर्षात तुर्कीने पाकिस्तानला सातत्याने मदत केली आहे.दोन्ही देशांच्या संघर्षात तुर्कीने पाकिस्तानची मदत करणे हे काही नवीन नाहीए…पाकिस्तानला तुर्कीने दिलेल्या ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशात सुरु असलेल्या संघर्षात तुर्कीने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे. खासकरुन काश्मीर मुद्द्यावर तुर्कीने नेहमीच पाकिस्तानला पाठींबा दिला आहे.भारतापासून ४००० हजार किमीवर असलेला हा देश भारताचा जानी दुश्मन का बनला ते पाहूयात…

तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांची मुस्लिम उम्माहच्या नेतृत्वाची महत्वाकांक्षा असल्याने तो सातत्याने पाकिस्तानचे समर्थन करत आला आहे. तुर्कीची सीमाला चीन सारखी आपल्या देशाला लागून नाही त्यामुळे जमिनीचाही कोणताही वाद नसतानाही तुर्की केवळ धर्मासाठीच पाकची तळी उचलून धरत असल्याचे स्पष्ट आहे.

 1948 पासून तुर्कियेचे भारताशी संबंध

भारतापासून सुमारे 4000 किलोमीटर हवाईअंतरावर तुर्की आहे. तुर्की आशिया आणि युरोप दोघांचा हिस्सा आहे. तुर्कीचा जादा हिस्सा हा आशियात मोडतो. आणि एक छोटासा हिस्सा युरोपात येतो. त्यामुळेच तुर्की नाटोचाही सदस्य आहे.भारत आणि तुर्की दरम्यान 1948 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. जास्तीत जास्त काळ दोन्ही देशांचे संबंध चांगले राहीले आहेत. परंतू अलिकडे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्या सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांच्या नात्यात कटूता आली आहे.

मग भारताच्या विरोधात का ?

भारत आणि तुर्की यांच्या दरम्यान कोणत्याही मुद्यावरुन झडप झालेली नाही. तरीही एर्दोगान ( २००३ ) सत्तेत आल्यानंतर तो पाकिस्तानची बाजू घेत आला आहे आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारताच्या विरोधात राहीला आहे. वास्तविक एर्दोगान यांचे स्वत:चे राजकारण मुस्लीम कट्टरतावादाकडे झुकलेले आहे.त्याच कारणाने पाकिस्तानची साथ देऊन ते आपल्या मतदारांना खुश करु इच्छित आहे.त्यामुळे त्यांना त्यांच्या देशातील कट्टर पंथीयांचे समर्थन मिळत आहे. त्याच जोरावर ते सत्तेत टीकून आहेत.

त्याचमुळे ते सातत्याने भारताच्या विरोधात बोलत असतात. तसेच एर्दोगान तुर्कीला ऑटोमन साम्राज्यसारखा प्रभाव शाली बनविण्याचे स्वप्नही भारत विरोधी स्टँडचे कारण आहे. तुर्की मुस्लिम उम्माह म्हणजे सर्व मुस्लीम देशांना एकत्र येण्याची विनंती करताना दिसत आहेत. एर्दोगान यांना मुस्लीम जगताचा नेता बनण्याचे स्वप्न त्यांना पाकच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात भूमिका घ्यायला भाग पाडत आहे.

भारत विरोधी भूमिका महागात पडणार ?

भारत-पाकिस्तानच्या दरम्यान अलिकडेच झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतही तुर्कीने पाकिस्तानची तळी उचलून धरली आहे.त्याचा मोठा फटका तुर्कीला बसणार आहे.भारतात तुर्कीच्या विरोधात बायकॉट मोहीम सुरु झाली आहे. लोक तुर्कीच्या सामानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत आहेत. पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीवरुन येणाऱ्या मालावर बहिष्काराची घोषणा केली आहे.

तीन लाख भारतीय तुर्की देशात पर्यटनाला

दरवर्षी तीन लाख भारतीय तुर्की देशात पर्यटनाला जात असतात.या घटनेमुळे या पर्यटनात भारतीयांनी तेथे जाण्यास नकार दिला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने तुर्कीसाठीची बुकींग बंद केली आहे. तेथील पर्यटन विभागाचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत. या दोन देशांदरम्यान १२ अब्ज डॉलरचा व्यापार होत आहे.

भारत आणि तुर्कीमध्ये मोठा व्यापार होतो

भारत तुर्कीला वाहनांचे सुटे भाग आणि मोटार वाहने, कापड आणि तयार कपडे, सेंद्रिय रसायने, रत्ने आणि दागिने, चहा, कॉफी आणि मसाले, लोखंड आणि स्टील उत्पादने निर्यात करतो.तर तुर्कीमधून भारत यंत्रसामग्री आणि उपकरणे, खनिज इंधन आणि तेल, तांबे आणि तांबे उत्पादने, चेरी आणि डाळींब आणि खते आयात करतो.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.