24 तासाच्या आत आणखी एका हिंदूची बांगलादेशात हत्या, जगात खळबळ, भर बाजारपेठेतच..
मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारात मोठी वाढ झाली. सातत्याने हिंदूंवर अत्याचार केली जात आहेत. त्यामध्येच आता 24 तासांमध्ये तब्बल दोन हिंदूंची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून भारताचा शेजारी देश बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. हिंदू लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत. हेच नाही तर हिंदू लोकांची हत्या केली जातंय, आता बांगलादेशातून धक्कादायक अशी बातमी पुढे येतंय. नरसिंदी जिल्ह्यातील चारसिंदूर बाजारात किराणा दुकान चालवणाऱ्या मणी चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीची चाकूने असंख्य वार करून हत्या करण्यात आली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मणी चक्रवर्ती याच्या दुकानात काही लोक घुसले आणि त्यांनी मणी चक्रवर्ती याच्यावर चाकूने हल्ला केला. जोपर्यंत मणीचा जीव जात नाही तोपर्यंत हे लोक त्याच्यावर हल्ला करत राहिले. हैराण करणारी बाब म्हणजे गेल्या 24 तासांमधील हिंदूंना टार्गेट करून केला जाणारा हा दुसरा हल्ला आहे. मागील काही दिवसांपासून हिंदूंना टार्गेट करून सतत हल्ले केली जात आहेत.
भर बाजारपेठत हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर स्थानिक लोक पुढे आले आणि त्यांनी मणी चक्रवर्ती याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मणीचे निधन झाले. सरकार किंवा स्थानिक प्रशासनाकडून या घटनेबद्दल कोणतेही विधान करण्यात आले नाही. मात्र, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ल्यात मोठी वाढ झाल्याने खळबळ उडाली. हा एक मोठा चिंतेचा विषय बनलाय.
5 जानेवारी 2026 रोजीच जेसोर जिल्ह्यातील मोनिरामपूर येथे कपालिया बाजारा राणा प्रताप बैरागी नावाच्या हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली. म्हणजेच काय तर अवघ्या 24 तासांमध्ये बांगलादेशात दोन हिंदू व्यक्तींवर हल्ला करण्यात आला. 45 वर्षीय राणा बैरागी हे केशवपुरचे रहिवासी असून त्यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. राणा बैरागी यांना हल्ल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली.
डिसेंबर 2025 मध्ये, मयमनसिंगमध्ये जमावाने दिपू चंद्र दास या हिंदू युवकाची हत्या झाली. त्यानंतर बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.अमृत मंडल यांची हत्या करण्यात आली. जानेवारी 2026 मध्ये शरीयतपूरमध्ये खोकॉन दास याला जिवंत जाळण्यात आले. राणा प्रताप बैरागी यांची भर बाजारात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता मणी चक्रवर्ती यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.
