Corona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी ठरण्याची शक्यता, युके वॅक्सिन टास्क फोर्स अध्यक्षांचा दावा

युनायटेड किंग्डम वॅक्सिन टास्कफोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी पहिल्या टप्प्यात तयार होणाऱ्या कोरोना लसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. पहिल्या टप्प्यात तयार होणाऱ्या लसी परिपूर्ण नसतील,असा इशारा त्यांनी दिला आहे. (UK vaccine taskforce chairman said first generation vaccine should be imperfect )

Corona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी ठरण्याची शक्यता, युके वॅक्सिन टास्क फोर्स अध्यक्षांचा दावा

नवी दिल्ली : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे 10 लाखांपेंक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावरील 154 लसींवर संशोधन करण्यात येत आहे. काही लसी मानवी चाचण्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र, युनायटेड किंग्डम वॅक्सिन टास्क फोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी पहिल्या टप्प्यात तयार होणाऱ्या कोरोना लसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. पहिल्या टप्प्यात तयार होणाऱ्या लसी परिपूर्ण नसतील. लोकांनी लसींबाबत अति आशावादी राहू नये, असं केंट बिंघम यांनी सांगितले.(UK vaccine taskforce chairman said first generation vaccine should be imperfect )

केट बिंघम म्हणाले की, कोरोना लस कधी उपलब्ध होईल हे सांगता येणार नाही. पहिल्या टप्प्यात तयार होणारी लस परिपूर्ण नसेल. या लसी कोरोनाचं संक्रमण रोखू शकत नाहीत. मात्र, कोरोना लक्षणं कमी करण्याचे काम करु शकतात. लसींच्या प्रभाव जास्त काळ राहणार नाही, असंही ते म्हणाले.

बिंघम यांनी कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या काही लसी किंवा सर्वच लसी अपयशी ठरु शकतात. आपल्याला 65 वर्षांवरिल व्यक्तींमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करणारी लस तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं केट बिंघम यांनी सांगितले.

जगातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पुरवठा करावी लागणार आहे. मात्र, कोरोना लसीचे डोस तयार करण्याची क्षमता कमी आहे. सद्य परिस्थितीत युनाइटेड किंग्डममधील कोरोना लसीचे डोस करण्याची क्षमता देखील फार कमी आहे, असं बिंघम म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट भयानक

लंडनमधील इंपिरियल कॉलेजमधील वैज्ञानिकांना एका संशोधनात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांमधील कोरोना विषाणू विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीची क्षमता कमी झाल्याचे आढळले. प्रतिकारक्षमता कमी झाल्यामुळे कोरोना संसर्ग जास्त वेळ राहण्याची शक्यता दिसून आली. कोरोनाची इंग्लंडमधील दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक धोकादायक असेल, असा अंदाज सरकारने वर्तवला आहे.

कोरोनावरील लसींचं संशोधन विविध देशांमध्ये सुरु आहे. मानवी चाचणी दरम्यान काहीवेळा लसींचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. ऑक्सफोर्ड आणि जॉनसन अँड जॉनसन कंपन्यांना त्याच्या कोरोना लसींच्या चाचण्या थांबवाव्या लागल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 154 कोरोना लसीवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. यापैकी 44 लसी मानवी चाचण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.

चीनच्या तीन कंपन्या सर्वात पुढे

कोरोना लसीच्या शर्यतीत सध्या चीन सर्वात पुढे आहे. चीनमधील तीन कंपन्या सिनोवाक(चीन), सिनोफार्म (वुहान) सिनोफार्म (बीजिंग) या कंपन्यांच्या लसींच्या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे. यामधील दोन कंपन्यांनी लस देशातील आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना द्यायला सुरूवात केली आहे. या कंपन्यांच्या लसीचा दुष्परिणाम समोर आलेला नाही.

संबंधित बातम्या :

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

Corona Vaccine | कोरोना लस संशोधनात ‘हा’ देश सर्वात पुढे, सर्वसामान्यांना लस कधी मिळणार?

(UK vaccine taskforce chairman said first generation vaccine should be imperfect )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *