AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूक्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होता धोका, SPG ने बनवला मोठा प्लॅन, अशी केली तटबंदी की…

Volodymyr Zelenskyy and Narendra Modi: भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबत युक्रेनमधील लोकांमध्ये नाराजी आहे. त्याची कल्पना पंतप्रधान कार्यालयाला आधीच होती. त्यामुळे पंतप्रधानांच्या टीमने एसपीजीला भारतविरोधी घटकांची माहितीही दिली होती.

यूक्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होता धोका, SPG ने बनवला मोठा प्लॅन, अशी केली तटबंदी की...
Volodymyr Zelenskyy and Narendra Modi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 24, 2024 | 11:57 AM
Share

रशिया आणि यूक्रेन दरम्यान युद्ध सुरु आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेन दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेनी राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्कीसोबत दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्याबाबत चर्चा केली. नरेंद्र मोदी यांचा दौरा संवेदनशील होता. कारण भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. त्यामुळे यूक्रेनमध्ये भारतासंदर्भात असंतोष निर्माण झाला होता. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ओसिसमधील पीस पार्कमध्ये महात्मा गांधींची प्रतिमा अनावरण करण्यासाठी पोहचले तेव्हा सुरक्षा अधिक कडक केली गेली. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ने तटबंदी केली. एसपीजीने पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी बुलेट रजिस्टँट शील्ड लावली होती.

60 एसपीजी कमांडो तैनात

भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबत युक्रेनमधील लोकांमध्ये नाराजी आहे. त्याची कल्पना पंतप्रधान कार्यालयाला आधीच होती. त्यामुळे पंतप्रधानांच्या टीमने एसपीजीला भारतविरोधी घटकांची माहितीही दिली होती. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे संचालक आलोक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली किमान 60 एसपीजी कमांडो तैनात करण्यात आले होते. भारतीय वंशाच्या लोकांच्या भेटीतही ही बाब समोर आली. रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांमुळे युक्रेनमधील नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे अनेकांनी भारतीय लोकांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले.

एसपीजी टीम 24 तास अलर्ट

मोदी यांच्या या दौऱ्यात एसपीजी टीम 24 तास अलर्टवर होती. नरेंद्र मोदी पीस पार्कमध्ये फिरतानाही स्नायपर्सची भीती होती. या परिस्थितीमुळे एसपीजी टीम अलर्टवर होती. वृत्तवाहिन्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसरात सैनिक तैनात केलेले दिसत आहे. तसेच बीआर शील्ड लावण्यात आल्याचे दिसून येते. नरेंद्र मोदी पोलंडला परत जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले तेव्हा एसपीजी टीमलाही दिलासा मिळाला. पोलंडमधूनच ते भारतात रवाना झाले.

आम्ही तटस्थ नाही, आमचा पक्ष…

पीएम मोदी यांनी वोलोदिमिर जेलेंस्की यांनी सांगितले की, शांततेसाठी दोन्ही पक्षांत संवाद गरजेचा आहे. रशियासोबत बसून शांततेचा मार्ग शोधला पाहिजे. आम्ही तटस्थ नाही. सुरुवातीपासून आम्ही शांततेची बाजू घेतली आहे. आम्ही बुद्धच्या धरतीवरुन येतो. यामुळे युद्धाला स्थान नाही. भारत रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आपली भूमिका बजावण्यास तयार आहे, असे मोदी यांनी जेलेंस्की यांना सांगितले.

Follow Us
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?