शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, रशियाचे तेलसाठे अखेर उद्ध्वस्त, सर्वात मोठा हल्ला, जग हादरलं, तब्बल 1 हजार किमी आत…
रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 39 जण जखमी झाले आहे, रशियाचे तेल साठे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

सध्या जगभरात युद्धाचं वातावरण आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणावाची स्थिती आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेमध्ये देखील युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या काळात अनेकदा रशियन सैन्यांनी युक्रेनमध्ये घुसून मोठे हल्ले केले, या हल्ल्यांमध्ये युक्रेनचं प्रचंड नुकसान झालं. मात्र आता युद्धभूमीतून मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनने थेट रशियामध्ये तब्बल 1 हजार किलोमीटर आत घुसून प्रचंड मोठा हल्ला केला आहे, या हल्ल्यामुळे रशिया हादरलं आहे. या हल्ल्यामध्ये बारा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 39 लोक जखमी झाले आहेत. युक्रेनने सोमवारी रशियाच्या निजनेकास्म्क शहरावर भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रशिया चांगलंच हादरलं आहे.
समोर आलेल्या माहितीप्रमाणे यूक्रेन ने निजनेकाम्स्क या शहरावर मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने हा हल्ला करून रशियाला दुहेरी धक्का दिला आहे, एक म्हणजे या हल्ल्यामध्ये 12 रशियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे युक्रेनकडून रशियाच्या ऊर्जा केंद्रांना देखील लक्ष्य करण्यात आलं आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सक्षम असलेल्या ड्रोनच्या माध्यमातून युक्रेनने हा हल्ला घडवून आणला आहे. युक्रेनकडून रशियाचे तेलसाठे असलेल्या केंद्रांना लक्ष करण्यात आले असून, देशात आता मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या हल्ल्यानंतर आता युक्रेनचे राष्ट्रपती वालदिमीर जेलेंस्की यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. आम्ही रशियावर हा हल्ला केला, त्यामागे आमचा उद्देश हा रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांना चर्चेसाठी मजबूर करण्याचा आहे, असं जेलेंस्की यांनी म्हटलं आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.