
रशिया युक्रेनमधील संघर्ष कमी होण्याचे नाव घेत नाहीये. मात्र, या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसतोय. रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नुकताच अत्यंत हैराण करणारे विधान केले. वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात काही दिवसांपूर्वीच बैठक झाली. वोलोदिमिर झेलेन्स्की डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी अमेरिकेला गेले होते. मात्र, चर्चेतून काहीच मार्ग निघू शकला नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल अत्यंत हैराण करणारे विधान वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केले असून थेट म्हटले की, इतर पाश्चात्य देशांप्रमाणे डोनाल्ड ट्रम्पला अजिबातच मी घाबरत नाही.
रशियाने युक्रेनच्या ऊर्जा ग्रिडवर हल्ला केला, ज्यामुळे कीवच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. रशियाकडून सातत्याने युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले केली जात आहेत. रशियाने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, आम्ही एकट्या युक्रेनसोबत नाही तर अख्या नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत. सर्व नाटो देश युक्रेनला युद्धासाठी मदत करत असल्याचा सातत्याने गंभीर आरोप रशियाकडून केला जातोय.
द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध सुधारण्यास मदत केली, हे अत्यंत खोटे असून हा दावा पूर्णपणे खोटा आहे. झेलेन्स्की म्हणाले, अमेरिका आणि ट्रम्प यांच्याशी आमचे संबंध सामान्य आहेत. वृत्तानुसार, ट्रम्प यांनी झेलेन्स्कीवर युद्ध संपवण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांच्या अटी मान्य करण्यासाठी दबाव आणला होता.
कारण जर युक्रेन सहमत झाला नाही तर पुतिन त्यांचा नाश करतील असे ते म्हणाले होते. झेलेन्स्की म्हणाले की, हे रशियाची युक्रेनवर बॉम्बहल्ला करण्याची क्षमता कमी करण्याच्या उद्देशाने आहे. झेलेन्स्की युद्ध थांबवण्यासाठी रशियासोबत चर्चा न करता थेट अमेरिकेचे पाय पकडताना सातत्याने दिसत आहेत. त्यामध्येच त्यांनी आता मोठे विधान केले. मात्र, युक्रेन आणि अमेरिकेतील संबंध सामान्य असल्याचे त्यांनी म्हटले. हेच नाही तर झेलेन्स्की यांनी ब्रिटन आणि फ्रान्सला भित्रे म्हटले आहे.