Russia Ukraine war : युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव; भारत,चीनने मतदान टाळले, काय आहे भारताची भूमिका?

रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडण्यात आला. रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावेत, तसेच युक्रेनमधील सैन्य माघारी बोलवावे अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती.

Russia Ukraine war : युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव; भारत,चीनने मतदान टाळले, काय आहे भारताची भूमिका?
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 9:57 AM

नवी दिल्ली : रशिया, युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine war) पार्श्वभूमीवर शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडण्यात आला. रशियाने (Russia) युक्रेनवरील (Ukraine) हल्ले थांबवावेत, तसेच युक्रेनमधील सैन्य माघारी बोलवावे अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती. या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाच्या बाजून 15 सदस्य देशांपैकी एकूण आकरा देशांनी मतदान केले तर भारत, चीन आणि यूएईने या तीन सदस्य देशांनी हल्ल्याच्या निषेध करत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे टाळले. तर रशियाने या प्रस्तावाविरोधात आपला व्हटोचा अधिकार वापरला. रशिया या प्रस्तावाच्या विरोधात आपला विशेष अधिकार वापरणार असल्याचा अंदाज सुरुवातीपासूनच लावण्यात येत होता. भारत, चीन आणि यूएईने या मतदान प्रक्रियेत सहभागी न होता अलिप्ततावादी धोरण स्विकारले आहे. मात्र दुसरीकडे पश्चिमेकडील देश रशियाविरोधात चांगलेच आक्रमक झाले असून, सुरक्षा परिषदेने मांडलेल्या या प्रस्तावावेळी रशिया एकटे पडल्याची टीका त्यांनी केली आहे.

भारताची भूमिका

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ति यावेळी बोलताना म्हटले की, युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध पेटले आहे. या घटनेने आमची चिंता वाढली आहे. युद्ध हे कोणत्याही गोष्टीवरील अंतिम सत्य असून शकत नाही. या युद्धावर लवकरता लवकर तोडगा निघावा आणि युद्ध समाप्तीची घोषणा व्हावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, युद्ध सुरू झाल्यामुळे त्यांची सुरक्षीतता धोक्यात आली आहे. युद्ध थांबवून चर्चेने प्रश्न सोडवला जावा असे आम्हाला वाटते. आम्ही युद्धाचा निषेध करत असून, मतदान प्रक्रियेमधून बाहेर पडत आहोत.

‘रशियाचा हल्ला मानवताविरोधी’

यावेळी बोलताना अमेरिकेची राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांनी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर केलेला हा हल्ला मानवताविरोधी आहे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. मानवाच्या कल्याणासाठी प्रयत्न व्हावेत. मात्र रशियाची ही कृती माणवताविरोधी आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जेव्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तेव्हा भारत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्व सदस्य देशांचे लक्ष लागले होते. भारताने या युद्धाचा निषेध करत मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याची भूमिका घेतली.

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : यूक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं रक्षण करणार, यूक्रेनला सैन्य आणि आर्थिक मदतही देणार- NATO

थरकाप उडवणारे रशियातील चेचन विशेष बल; युक्रेनमध्ये या सैनिकांना विरोध केला तर सरळ मृत्यूदंडच

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी हलचाली वाढल्या, कसा संपर्क साधाल?

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.