भारतावर 25 टक्के टॅरिफ, वाट लागणार, भारताची पहिली प्रतिक्रिया थेट अमेरिकेच्या..

भारतावर टॅरिफचे मोठे संकट आहे. त्यातच आता भारताने अमेरिकेच्या टॅरिफ प्रस्तावाला मोठे उत्तर दिले. यावेळी फक्त भारतच नाही तर भारतासह अन्य देशांवरही टॅरिफचे संकट आहे. पाकिस्तान सोडून इतर भारताच्या शेजारी देशांवरही टॅरिफ लागणार आहे.

भारतावर 25 टक्के टॅरिफ, वाट लागणार, भारताची पहिली प्रतिक्रिया थेट अमेरिकेच्या..
India US tariffs
| Updated on: Nov 26, 2026 | 7:20 AM

अमेरिका भारतासह चीन आणि युरोपियन युनियनवर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. तसा प्रस्तावही देण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनसह अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची तयारी करत आहेत. अमेरिकेत वाढलेली मोठी महागाई यादरम्यान त्यांच्याकडून हा निर्णय घेतला जात आहे. त्यातच त्यांनी वेगवेगळी श्रेणी तयार केली. भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आहे. भारताचा शेजारी देश चीनवर 40 टक्के टॅरिफ लागणार आहे. पाकिस्तानला या टॅरिफमधून वगळण्यात आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हने भारत, इंडोनेशिया, कंबोडिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, तैवान आणि थायलंडवर 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. इतके दिवस मोठ्या टॅरिफमधून बांगलादेशला वगळण्यात आले होते. मात्र, आता या टॅरिफमध्ये बांगलादेशही अडकणार आहे.

USTR ने बांगलादेश, युरोपियन युनियन, जपान, स्वित्झर्लंड आणि सिंगापूरवर 20 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातच 40 टक्के टॅरिफ लावण्याच्या देशाच्या यादीत चीनचा समावेश आहे. चीन आता अमेरिकेविरोधात नक्की काय भूमिका घेतो, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. चीन देखील अमेरिकेवर टॅरिफ लावू शकतो.

Loading...

अमेरिकेने घेतलेल्या या टॅरिफच्या निर्णयावर भारताकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली. भारताने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने सांगितले की, या प्रकरणातील चौकशीबाबतची नोटीस तपासली जात आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी अमेरिकेसोबत रचनात्मक चर्चा केली आहे. भारत चर्चेसाठी तयार आहे. वाणिज्य विभागाने स्पष्ट केले की, भारतातील कोणत्याही क्षेत्रात संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन क्षमता नाही.

अमेरिकेकडून सांगितले जात आहे की, आठ महिने विचार आणि अभ्यास करूनच आम्ही हा निर्णय घेतला. भारताने म्हटले की, अमेरिकेसोबतच्या व्यापारविषयक सर्व मुद्द्यांवर चर्चा ही सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या  वाटाघाटींच्या चौकटीतच केली जावी. दोन्ही देश या कराराबाबत चर्चा करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावला होता. त्याच पुन्हा एकदा भारतावर मोठे संकट टॅरिफचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us