AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण विरोधात अजून एक देश उतरणार मैदानात, ज्याची भीती तेच घडतय, मोठा हाहाकार..

इराणविरोधातील युद्धात अमेरिकेचा मोठा गेम आहे. आपल्या सैन्याला थेट इराणच्या भूमीवर उतरवण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी घातक योजना आखली आहे. ज्याने एकच खळबळ उडाली. इराणवर ताबा मिळवण्याच्या तयारीत अमेरिका आहे.

इराण विरोधात अजून एक देश उतरणार मैदानात, ज्याची भीती तेच घडतय, मोठा हाहाकार..
iran
| Updated on: May 18, 2026 | 12:10 PM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव आहे. इराणकडून युएईवर करण्यात आलेल्या हल्ल्याने परिस्थिती अधिक बिघडली. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईला थेट इराणकडून एक त्यांचे महत्वाचे बेट ताब्यात घेण्यास सांगितले. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून युएईला थेट इराणविरोधातील युद्धात मैदानात उतरण्यास सांगितले. याकरिता त्यांना प्रोत्साहन देखील देण्यात आले. ट्रम्प प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने यावर बोलताना सांगितले की,  युएईच्या लष्कराचा वापर केल्यास अमेरिकी सैन्याला थेट युद्धभूमीत जाण्यापासून रोखता येईल. यादरम्यान बोलताना अधिकाऱ्यांनी म्हटले की, जा आणि त्यांच्यावर ताबा मिळवा. जमिनीवर अमेरिकी सैन्याऐवजी युएईचे सैन्य असेल. जर खरोखरच युएईने अमेरिकेचे ऐकले तर मोठा हाहाकार उडवू शकतो.

इराणकडून युएईच्या ऊर्जा ठिकाणांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्धात इराण युएईवर सतत हल्ले करत आहे. इराण हल्ले करत असल्याने इस्त्रायल, अमेरिका यांच्यासोबत युएईचे संबंध सुधारले आहेत. सतत तिन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामध्येच अमेरिकेने इराणवर हल्ला करत त्यांचे महत्वाचे बेट तुमच्या ताब्यात घेण्यास युएईला सांगितले. मात्र, यात सर्वात जास्त नुकसान कोणाचे असेल तर ते युएईचे.

कारण अमेरिकेची इच्छा आहे की, युएईने आपले लष्कर इराणच्या जमिनीवर उतरावे. ज्यामुळे मोठा हल्ला होईल आणि शिवाय अमेरिकेच्या लष्कराला कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणच्या जमिनीवर उतरण्याची गरज पडणार नाही. अमेरिकेचा सर्व प्लॅन सेट आहे. पण आता या युएई किती प्रतिसाद देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. जर युएई युद्धात उतरले तर परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी अधिक घातक होईल.

इराण आणि अमेरिका युद्धाला 12 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. मात्र, हे युद्ध काही थांबत नाही. अमेरिकेकडून इराणला एक प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव मान्य केल्याशिवाय इराणकडे कोणताही दुसरा पर्याय नसल्याने अमेरिकेचे म्हणणे आहे. यादरम्यानच थेट युएईला अमेरिकेकडून युद्धाच्या मैदानात उतरवले जात आहे. तोच गेम अमेरिकच्या डोक्यात आहे. मात्र, आता युएई नक्की काय भूमिका घेतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक