अमेरिकेने जगाला पुन्हा हादरवलं! चीनमधून निघताच एअर स्ट्राईक, मारलेला खरतनाक दहशतवादी कोण? कुंडलीच समोर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी चीन दौऱ्यावरुन परत येताच एका देशावर एअरस्ट्राइक केला आहे. आता नेमकं काय घडलं जाणून घ्या...

अमेरिकेने जगाला पुन्हा हादरवलं! चीनमधून निघताच एअर स्ट्राईक, मारलेला खरतनाक दहशतवादी कोण? कुंडलीच समोर
डोनाल्ट ट्रम्प
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 16, 2026 | 5:10 PM

गेल्या काही दिवसांपासून मिडल इस्टमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सतत सुरु असलेल्या संघर्षादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प चीन दौऱ्यावर गेले आहेत. ट्रम्प यांचा हा दोन दिवसांचा दौरा होता. या दौऱ्यावरुन परत येताच अमेरिकेने एका देशावर एअर स्ट्राईक केला आहे. या स्ट्राइकमध्ये जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी मारला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे कि, अमेरिकन आणि नायजेरियन सैन्याने एकत्र येत एका मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेला यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेत आयसिस (ISIS) चा दुसरा सर्वात मोठा कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकी याला ठार करण्यात आले. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली. हे ऑपरेशन अत्यंत कठीण होते आणि संपूर्ण नियोजनासह पार पाडले गेले, असे ट्रम्प यांनी सांगितले. अबू-बिलाल अल-मिनुकी आफ्रिकेत लपून दहशतवादी कारवाया चालवत होता आणि जगभरातील ISIS च्या ऑपरेशन्समध्ये त्याची मोठी भूमिका होती, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मते, अल-मिनुकीला वाटायचे की तो आफ्रिकेत लपून सुरक्षित राहू शकतो, परंतु अमेरिकन संस्थांकडे त्याच्या प्रत्येक हालचालींची सातत्याने माहिती होती. “आता तो आफ्रिकेतील लोकांना घाबरवू शकणार नाही किंवा अमेरिकनांविरुद्ध हल्ल्यांचे कट रचू शकणार नाही,” असे ट्रम्प म्हणाले. या कारवाईमुळे ISIS च्या जागतिक नेटवर्कला आणि त्यांच्या ऑपरेशन्सना मोठा धक्का बसल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी नायजेरिया सरकार आणि तेथील सैन्याचे आभार मानले. आपल्या निवेदनाच्या शेवटी त्यांनी ‘गॉड ब्लेस अमेरिका’ म्हणत अमेरिकन सैन्याचे कौतुक केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ट्रम्प यांचा हा दौरा अशा वेळी झाला, जेव्हा मिडल ईस्टमध्ये (मध्य पूर्व) इराणसोबत अमेरिकेचे युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चाही सुरू आहे. या काळात चीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण चीन हा इराणचा चांगला मित्र देश आहे. इराणसोबत सुरू असलेले हे युद्ध संपवण्यासाठी चीनने पुढाकार घेऊन चर्चा करावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे.

कोण होता अबू बक्र अल मैनुकी?

अबू बक्र अल मैनुकी इस्लामिक स्टेटचा प्रमुख नेता होता. इस्लामिक स्टेटचा तो जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता. दहशतवादी गटांचा लेखाजोखा ठेवणारी संस्था काऊंटर एक्सट्रीमिज्म प्रोजेक्टच्या नुसार, मैनुकीचा जन्म 1982मध्ये नायजेरियाच्या बोर्नो प्रांतात झाला होता. 2018मध्ये मम्मन नूर मारला गेल्यानंतर त्याने पश्चिम आफ्रिकेत आयएसची सूत्रे हाती घेतली. तो आफ्रिकेच्या साहेल परिसरातच अधिक राहायचा असं सांगितलं जातं. अटलांटिक महासागरपासून ते पूर्वेत लाल सागरपर्यंतचा हा पट्टा आहे. हा परिसर अनेक देशांशी संबंधित आहे.

Follow Us