देर आये दुरुस्त आये…अमेरिकन राजदुताच्या वक्तव्याचा अर्थ कळला का? काय म्हणाले सर्जियो गोर?

Donald Trump-Narendra Modi : अमेरिकेचा सूर पालटला आहे. पण नूर कधी पालटणार याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे नवीन राजदूत सर्जियो गोर यांचे वक्तव्य वाचल्यावर तुम्हाला ही असेच वाटेल की देर आये दुरुस्त आये....

देर आये दुरुस्त आये...अमेरिकन राजदुताच्या वक्तव्याचा अर्थ कळला का? काय म्हणाले सर्जियो गोर?
फिर वही दिल लाया हूं
| Updated on: Sep 12, 2025 | 9:31 AM

अमेरिकेचे नवीन राजदूत सर्जियो गोर यांच्या वक्तव्याने दुधात साखर घोळली. गेल्या काही दिवसांपासून टॅरिफ वॉरमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणल्या गेले. खासमखास मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्राला दे धक्का देण्याचा प्रयत्न केला. पण भारत अजून काही त्यांच्या धाकटशाहीला जुमानले नाही. आता गोर यांच्या वक्तव्याने काळजीचा सूर पालटल्याचे चित्र आहे. पण जोपर्यंत धोरण बदलत नाही, तोपर्यंत भारत अमेरिकेबाबत साशंकच असेल हे नक्की.

गोर यांच्या वक्तव्याने नवीन चर्चा

तर सर्जियो गोर हे अमेरिकेचे भारतातील नवीन राजदूत असतील. त्यांनी त्यापूर्वीच मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कधी टीका केली नाही. भारतावर टीका केली आहे. पण याचा अर्थ दोघांमधील मैत्री संपली असे नाही. ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले आहे. दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री आहे. तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकले, वाचले असेल तर या दोघांनी वैयक्तिक टीका केलेली नाही. एरव्ही दोन्ही देशात कटुता येते तेव्हा अगोदर नेते एकमेकांवर टीका करतात, असे गोर म्हणाले.

मग रशियाच्या इंधनाबाबत भूमिका काय?

गोर यांनी रशियाकडून भारत खरेदी करत असलेल्या तेलाविषयी मत मांडले. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणे हीच ट्रम्प यांची गरज आहे. टॅरिफ करारावर भारत आणि अमेरिकेत फार मोठा वाद नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी यासाठीच सर्व प्रयत्न सुरू आहे. दोन्ही देशातील टॅरिफ करारावर मोठे मतभेद होणार नाहीत याची अगोदरच काळजी घेण्यात आली आहे. केवळ मुद्दा रशियाच्या इंधन खरेदी कळीचा मुद्दा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच तोडगा निघेल

यावेळी गोर यांनी एक खास खुलासा केला. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गोर म्हणाले की, आम्ही भारताकडून इतर देशांपेक्षा अधिक अपेक्षा ठेऊन आहोत. कधी कधी अशा गोष्टी होतात. पण मला वाटते की सध्या जी कोंडी आहे ती लवकरच फुटेल आणि लवकरच या वादावर तोडगा निघेल. गोर यांच्या वक्तव्यामुळे आता भारत-अमेरिकेतील वाद निवळण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते.