मोठी बातमी ! कोणत्याही क्षणी हल्ला होणार, अमेरिकन सैन्याच्या हालचाली वाढल्या, इराण संकटात

US Iran Tension : इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. अमेरिकन सैन्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी ! कोणत्याही क्षणी हल्ला होणार, अमेरिकन सैन्याच्या हालचाली वाढल्या, इराण संकटात
us iran tension
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 13, 2026 | 5:41 PM

गेल्या काही दिवसांसून जगातील अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. खासकरून इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन रोखण्यासाठी इराणी सरकारने बळाचा वापर केला. यामुळे 100 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे. आंदोलकांच्या मृत्यूनंतर अमेरिकेने इराणला गंभीर इशारा दिला होता. जर आंदोलकांचे मृत्यू थांबले नाही तर अमेरिकन सैन्य इराणमध्ये प्रवेश करू शकते असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अशातच आता या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे अमेरिकन सैन्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिका इराणवर हल्ला करण्याची अटकळ गेल्या काही काळापासून बांधली जात आहे. अशातच आता अमेरिकेने कतारच्या अल उदेद हवाई तळावर आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार या ठिकाणी अमेरिकन लढाऊ विमानांच्या हालचाली वाढल्या आहेत. काही तासांपूर्वी अमेरिकेने सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तात्काळ देश सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता अमेरिका कधीही इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

अल उदेद हवाई तळ कुठे आहे ?

अल उदेद हे अमेरिकन हवाई तळ कतारची राजधानी दोहापासून सुमारे 35 किलोमीटर नैऋत्येला आहे. हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे. या ठिकाणी 10 हजारांपेक्षा जास्त अमेरिकन सैनिक आहेत. या तळावर 4500 मीटर लांबीची धावपट्टी आहे. ही धावपट्टी B-52 स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स, KC-135 हवाई इंधन भरणारे टँकर आणि वाहतूक विमाने यांच्यासाठी गरजेची आहे. हे यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) चे मुख्यालय देखील आहे, तसेच हे ठिकाण इराणी सीमेपासून फक्त 200-300 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या ठिकाणावरून इराणवर हल्ला केला जाऊ शकतो.

हालचाली वाढल्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 12 जानेवारीला अल उदेद येथून KC-135 हवेत इंधन भरणारे टँकर आणि B-52 स्ट्रॅटेजिक बॉम्बर्ससह अनेक अमेरिकन विमानांनी उड्डाण केले. KC-135, KC-46A पेगासस टँकर, C-17 ग्लोबमास्टर III आणि C-5M गॅलेक्सी सारखी जड वाहतूक विमाने मध्य पूर्वेकडे जात होती. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता अमेरिका इराणवर कारवाई करणार असल्याचं बोललं जात आहे.