Iran vs US : प्रत्यक्ष लढाईआधीच इराणची अमेरिकेवर मोठी मात, भारतासाठी सुद्धा खूप मोठा इशारा
Iran vs US : अमेरिकेने अजून इराणमध्ये लष्करी कारवाई सुरु केलेली नाही. इराणने आपल्यावर हल्ला झाल्यास अमेरिकी तळांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. अजून ही लढाई सुरु झालेली नाही. मात्र, त्याआधीच इराणने एका बाबतीत अमेरिकेवर मात केली आहे. हा अमेरिकी टेक कंपन्यांसाठी मोठा झटका आहे.

सध्या संपूर्ण इराणमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरु आहे. यामध्ये जवळपास 500 निरपरांधानी आपले प्राण गमावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, खामेनेई प्रशासनाने आंदोलकांवर गोळ्या चालवल्या, तर आम्ही हस्तक्षेप करु असा इशारा दिला आहे. अमेरिकेकडून इराणमध्ये लष्करी कारवाई केली जाईल अशी शक्यता आहे. प्रत्यक्ष लढाईआधी मात्र इराणने अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीकडून उपग्रह आधारित इंटरनेट सेवा दिली जाते. कुठल्याही परिस्थितीत ही स्टारलिंकची इंटरनेट सेवा बाधित होणार नाही असं म्हटलं जातं. पण ताज्या रिपोर्ट्सनुसार इराणने देशव्यापी विरोध प्रदर्शनादरम्यान स्टारलिंकच्या इंटरनेटला यशस्वीरित्या जॅम केलं. रशिया आणि चीनकडून मिळालेल्या मिलिट्री ग्रेड टेक्नोलॉजीमुळे हे शक्य झाल्याचा अंदाज आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्ट्नुसार, लांब राहून कुठल्याही देशातील शासन आपण बदलू शकतो, असा विचार करणाऱ्या अमेरिकी टेक कंपन्यांसाठी हा मोठा झटका आहे. हे स्वप्न आता काळ्या अंधारात बदललं आहे. एलॉन मस्क आणि अमेरिकी सरकारने स्टारलिंकला हुकूमशाहंविरोधात एक शस्त्र म्हणून विकलं होतं. हे सॅटलाइट आधारित इंटरनेट आहे, जे पारंपारिक नेटवर्कपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करतं. विरोध प्रदर्शनात वापर करण्यासाठी स्टारलिंकची टेक्नेलॉजी दिली होती. पण इराणसारख्या देशाने चीन आणि रशियाकडून मिळालेल्या टेक्नोलॉजीचा इलेक्ट्रॉनिक वारफेयरचा (ईडब्ल्यू) वापर केला. त्यावेळी स्टारलिंकची सॅटलाइट आधारित इंटरनेट सेवाच काम करु शकली नाही. परिणामी आंदोलनातील कम्युनिकेशन बंद झालं. खामेनेई यांचं शासन अजूनही टिकून आहे.
इंटरनेट ब्लॅकआऊट केलं
इराणने सुरु असलेली विरोध प्रदर्शन रोखण्यासाठी संपूर्ण देशात इंटरनेट ब्लॅकआऊट केलं. स्टारलिंकचा बायपास करण्यासाठी वापर केला जात होता. पण मिलिट्री जॅमर्सनी हे सुद्धा रोखलं. तेहरानमध्ये स्टारलिंकचे सहा कनेक्शन्स बाधित झाले. 80 टक्क्यापेक्षा जास्त ट्रॅफिकवर परिणाम झाला.
…तर जगात कुठेही असं होऊ शकतं
ही फक्त इराण आणि आंदोलकांमधील लढाई नाही. रशिया-चीन विरुद्ध अमेरिकन टेक कंपन्या अशी लढाई आहे. त्यांनी सिद्ध केलं की ते अमेरिकेच्या प्रमुख सिविलियन-मिलिट्री एसेट निष्प्रभ करु शकतात. स्टारलिंक जर इराणमध्ये आंधळं होऊ शकतं, तर जगात कुठेही असं होऊ शकतं. रशियन इंटेलिजन्सने इराणला जॅमिंग सिस्टिम दिली आहे. ते स्टारलिंकचे सिग्नल ब्लॉक करतात.
