मोठी बातमी! भारतात येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा भीषण हल्ला, भयानक स्फोटाने जगात खळबळ!

US Attack on Aeroplan : अमेरिकेने इराणवर एक भीषण हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. यात भारताकडे येणाऱ्या एका विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! भारतात येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा भीषण हल्ला, भयानक स्फोटाने जगात खळबळ!
Mahan
Image Credit source: Google
| Updated on: Mar 30, 2026 | 3:01 PM

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या एका महिन्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भीषण हल्ले होत आहेत. त्यामुळे मध्यपूर्वेत खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन करत आहेत. अशातच आता अमेरिकेने इराणवर एक भीषण हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. यात भारताकडे येणाऱ्या एका विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेचा मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण हवाई हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणमधील मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यावेळी विमानतळावर एक विमान उभे होते. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात महान एअर या कंपनीने एक नागरी विमान नष्ट झाले आहे. हे विमान युद्धग्रस्तांसाठी सामग्री नेण्यासाठी दिल्लीला येणार होते अशी माहिती समोर आली आहे. या विमानातून युद्धग्रस्तांसाठी 11 टनांहून अधिक औषधे नेली जाणार होती अशी माहिती समोर आले आहे.

विमान दिल्लीला मदत नेण्यासाठी येणार होते

इराणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीतून मानवीय मदत घेऊन इराणला परत येणार होते. यात भारतीय नागरिकांनी इराणी नागरिकांसाठी जमा केलेल्या साहित्याचाही समावेश होते. मात्र, हे विमान दिल्लीला पोहोचण्याआधीच अमेरिकेच्या हल्ल्याचे शिकार झाले आहे. इराणने याला मदत आणि मानवीय सहाय्यावर केलेला हल्ला असे म्हटले आहे. त्यामुळे आता इराणकडून दुसरे विमान मदत आणण्यासाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे.

तेहरानवर इस्रायलचा हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार, इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ले वाढवले आहेत. इस्रायलने सोमवारी सांगितले की, आम्ही संपूर्ण तेहरानमधील लष्करी ठिकाणांवर हल्ले करत आहेत. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच युद्धबंदीचा करार होऊ शकतो अशी माहिती दिली होती. मात्र असं असलं तरी अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवरील हल्ले वाढवले असल्याचे समोर आले आहे. याचा फटका इराणसह संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे.

Follow Us