Chhagan Bhujbal on Gas Shortage | गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हॉटेल्स बंद पडली असून गॅसवर चालणारे छोटे-मोठे व्यवसायही ठप्प झाले आहेत.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हॉटेल्स बंद पडली असून गॅसवर चालणारे छोटे-मोठे व्यवसायही ठप्प झाले आहेत. या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत उपाययोजना सुचवल्या. भुजबळ म्हणाले, “नागरिकांनी त्यांच्या भागात PNG सेवा देणाऱ्या कंपनीकडे तातडीने अर्ज करावा. तीन महिन्यांत पाइपलाइनचे काम पूर्ण झाले नाही, तरी अर्ज केलेला असल्यास LPG सेवा बंद होणार नाही.” ते पुढे म्हणाले, “जर नागरिकांनी अर्ज केला नाही, तर तीन महिन्यांनंतर LPG सेवा बंद होण्याची शक्यता आहे. मात्र ही अट सर्वत्र लागू नाही. ज्या महानगरांमध्ये PNG प्रकल्प सुरू आहे, तेथेच ही अंमलबजावणी होणार असून इतर भागांमध्ये LPG सेवा सुरूच राहील.” याशिवाय, व्यावसायिक वापरासाठी गॅस कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
Published on: Mar 30, 2026 03:40 PM
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या

