मोठी बातमी! युद्ध पुन्हा पेटलं, अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, जगभरात मोठी खळबळ
मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर आली आहे, पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे, अमेरिकेनं इराणवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील जॉर्डन आणि कुवेतवर हल्ला केला आहे.

अमेरिकेनं पुन्हा एकदा इराणवर भीषण हल्ला केला आहे. यावेळी इराणच्या पोर्ट सिटी बंदर अब्बासला निशाणा बनवण्यात आलं आहे. अब्बास बंदरामध्ये अनेक स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. इराणी सैन्याच्या पायाभूत सुविधांना अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. दरम्यान अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने आता अमेरिकेचे सहकारी असलेले देश जॉर्डन, बहरीन आणि कुवेत या देशांवर एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचं पुन्हा एकदा प्रचंड नुकसान झालं आहे, त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.
इराणच्या मेहर न्यूज एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार होर्मुज स्ट्रेटवर असलेल्या इराणी पोर्ट सिटी बंदर अब्बासवर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरून प्रचंड आगीचे लोट उठल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. बंदर अब्बास इराणच्या होर्मोज्गान प्रांताची राजधानी आणि फारसच्या खाडीदरम्यान स्थित आहे. बंदर अब्बास हे इराणच्या आर्थिक, सैन्य तसेच व्यापारी दृष्टीकोणातून महत्त्वाचं ठिकाण आहे. नेमकं याच बंदाराला अमेरिकेकडून आता लक्ष्य करण्यात आलं आहे. या हल्ल्यामध्ये इराणच्या 14 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
इराणकडून प्रति हल्ला
दरम्यान दुसरीकडे अमेरिकेनं अब्बास बंदरावर हल्ला केल्यानंतर आता इराणने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे, इराणने अमेरिकेचे सहकारी असलेल्या बहरीन, जॉर्डन आणि कुवेत या देशांवर एअर स्ट्राईक केला आहे. या देशांमध्ये अमेरिकन सैन्यांचे तळं आहेत. इराणकडून सुरू झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जॉर्डनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सायरन वाजवण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली होती, परंतु आता पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी पाकिस्तानकडून मध्यस्थी करण्यात आली होती, परंतु आता पुन्हा एकदा युद्ध पेटलं आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ल्याला सुरुवात झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे.