पाकिस्तानचे अमेरिकेत वाभाडे, शाहबाज शरीफ तर कठपुतळी, खरा किंग कोण?
पाकिस्तानमध्ये लष्कराला फार महत्त्व आहे. सरकारच्या निर्णयात लष्कर प्रमुखाचा फार महत्वाचा सहभाग असतो, असे म्हटले जाते.

पाकिस्तानमध्ये लष्कराला फार महत्त्व आहे. या देशात कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर इथल्या लष्करप्रमुखाचाही त्यात महत्त्वाचा सहभाग असतो, असे बोलले जाते. यामुळेच पाकिस्तानमध्ये नेमकी सत्ता निवडून आलेल्या सरकारची असते की लष्कराची? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान असले तरी जनरल मुनीर हेच सूत्र हालवतात, असे म्हटले जाते. असाच सूर अमेरिकेच्या संसदेतही उमटला आहे.
लष्कराचा हस्तक्षेप यावरही विस्तृत चर्चा
मंगळवारी अमेरिकेन काँग्रेसमध्ये एका विशेष समितीने पाकिस्तानमध्ये होत असलेल्या मानवी अधिकारांचे हनन आणि लोकशाहीची होत असलेली हत्या यावर खुली चर्चा झाली. याच चर्चेत पाकिस्तानातील सरकार, तेथील लष्कराचा हस्तक्षेप यावरही विस्तृत चर्चा झाली. या चर्चेचे नेतृत्व अमेरिकेतील मानवी हक्क आयोगाचे सह-अध्यक्ष टॉम लँटोस आणि रिपब्लिकन पक्षाचे खासदार एच स्मिथ यांनी केले.
चर्चेत नेमकं काय काय घडलं?
या चर्चेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी तसेच सल्लागार जुल्फी बुखारी यांनीही पाकिस्तानची पोलखोल केली. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीविरोधात साधारण 200 वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व खटले सुडाच्या भावनेतून दाखल करण्यात आले आहेत, असे बुखारी यांनी सांगितले.
न्यायालयावरही दबाव आहे
जुल्फी बुखारी या चर्चेत म्हणाले की, पाकिस्तानात सध्या लोकशाही राहिलेली नाही. तिथे माध्यमांना बोलू दिले जात नाही. पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना नोकरीवरून काढून टाकलं जातं. न्यायालयावरही दबाव आहे. संसदेत न्यायाच्या संकल्पनेला खिळखिळे करणारे विधेयकं मंजूर केले जात आहेत. विअशे, म्हणजे अमेरिकेची प्रसिद्ध संस्था फ्रिडम हाऊसनेही पाकिस्तान हा पार्टली म्हणजेच अर्धा मुक्त देश आहे. या रिपोर्टनुसार पाकिस्तानमधील सरकार स्थापन करण्यात तसेच सरकार पाडण्यात सेनेचा हस्तक्षेप असतो.
दरम्यान, आता थेट अमेरिकेत वाभाडे निघाल्यामुळे पाकिस्तान जागतिक पातळीवर उघडा पडल्याचे म्हटले जात आहे. आता पाकिस्तान यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
