AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने F35 फायटर जेट उडवलं, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने थेट मागितले 200 अब्ज डॉलर्स, युद्धात थेट..

अमेरिका आणि इराण युद्धाला आज 20 दिवस पूर्ण झालीत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध रोखण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, सध्याच्या घडीला युद्ध रोखण्याचे कोणतेही संकेत नाहीत. यादरम्यानच अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

इराणने F35 फायटर जेट उडवलं, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने थेट मागितले 200 अब्ज डॉलर्स, युद्धात थेट..
F35 fighter jet and Donald Trump
| Updated on: Mar 20, 2026 | 9:30 AM
Share

इराणसोबतच्या युद्धात अमेरिका थेट मैदानात आहे. आज युद्धाला 20 दिवस पूर्ण झाली. मात्र, युद्ध काही थांबत नाही. आताच इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी लवकरच युद्ध थांबेल असे भाष्य केले. या युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. तेलाचा किमती वाढल्या आहेत. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक सिलेंडर बंद आहेत. परिस्थिती अधिक घातक होत आहे. भारत कतारकडून 47 टक्के गॅस आयात करतो. आता कतारमधील गॅस प्रकल्पावर हल्ला करण्यात आला. यामुळे गॅसच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार स्पष्ट आहे. अमेरिकेचेही मोठे नुकसान युद्धात झाले. अमेरिकेने विचारही केला नाही, असे सडेतोड उत्तर इराण युद्धात देत आहे. युद्ध काही महिनेही चालू शकते, असे संकेत इराणकडून देण्यात आले. यासोबतच इराणने स्पष्ट केले की, इराणला जास्त काळ युद्ध लढण्याचा अनुभव आहे.

अमेरिकेने इराणसोबतच्या संघर्षासाठी तब्बल 200 अब्ज डॉलर्सच्या निधीची मागणी केली आहे. अमेरिकेकडून तब्बल 200 अब्ज डॉलर्सची मागणी करण्यात आल्याने हे युद्ध अधिक काळ चालू ठेवण्याचे अमेरिकेच्या डोक्यात असल्याचे यावरून दिसत आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, वाईट शक्तींचा पराभव करण्यासाठी या पैशांची गरज आहे.

इराणकडून अमेरिकेच्या हवाई दलातील एफ-35 लढाऊ विमान पाडण्यात आल्यानंतर ही मागणी करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धात बैठकीदरम्यान स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकी सैन्य कुठेही पाठवणार नाहीत. काहीही झाले तरीही अमेरिकेचे सैन्य पाठवणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलल्याचे बघायला मिळत आहे.

कारण इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये अमेरिकी सैन्य उतरवण्याची भाषा केली होती. मात्र, आता त्यांनी माघार घेतली. अमेरिका आणि इराण युद्धाला आज 20 दिवस पूर्ण झाली पण हे युद्ध थांबत नाही. पेंटागॉनने अमेरिकी काँग्रेसकडे 200 अब्ज डॉलर्सच्या निधीची मागणी केली आहे. प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, व्हाईट हाऊसलाही अशीच विनंती पाठवण्यात आली आहे.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......