AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडले! अमेरिकेचे इराणवर मोठे हल्ले, डोनाल्ड ट्रम्प यांचा हादरवणारा आदेश, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध पेटले आहे. अमेरिकेने इराणच्या महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यास सुरूवात केली. अमेरिकेच्या अध्यक्षांनी लष्कराला इराणवर हल्ले करण्याचे आदेश दिले. आता इराणही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, त्यांनी तसा इशारा दिला.

ज्याची भीती तेच घडले! अमेरिकेचे इराणवर मोठे हल्ले, डोनाल्ड ट्रम्प यांचा हादरवणारा आदेश, थेट..
US attack iran
| Updated on: Jun 10, 2026 | 7:14 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढला. गेल्या काही दिवसांपासून युद्धसंधी होती. अखेर अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. युद्धसंधीदरम्यान हा हल्ला अमेरिकेने केला. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले. युद्धविरामाकरिता चर्चा सुरू होती. मात्र, जगाला ज्याची भीती होती तेच पाऊल अमेरिकेने उचलले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या ज्वाळा पुन्हा एकदा भडकल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जगातील सर्वात महत्वाचा समुद्रीमार्ग होर्मुज सामुद्रधुनीलाच थेट युद्धाचे मैदान बनवले. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सातत्याने इराणवर हल्ला करण्यापासून रोखत होते. या मुद्दामध्ये त्यांच्यात वादही झाला. मात्र, आता स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले. बेंजामिन नेतान्याहू यांना शांत राहा नाही तर युद्ध भडकेल सांगणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीच आता इराणवर हल्ल्यांचा भडिमार केला.

अमेरिका आणि इराण यांच्या युद्धविरामासाठी चर्चा सुरू आहे. कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, दोन आठवड्यात युद्ध संपेल. मात्र, आता पुन्हा इराणला पेटला आहे. होर्मुजजवळ अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याने इराणवर हल्ला करण्यात आला. अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम सुटला. मात्र, आता परिस्थिती अधिक चिघळली आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा बदला इराण घेणार आहे.  इराणकडून इशारा देण्यात आला.

ज्यामुळे आता युद्धाची आग भडकणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर होर्मुज खाडीत तणाव वाढला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे ‘एएच-64 अपाचे (AH-64 Apache) हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेमागे इराणचा हात असल्याचा दावा अमेरिकेने केला. दुसरेकडे अमेरिकेने केलेले हे आरोप इराणने फेटाळून लावले. याचाच बदला म्हणून अमेरिकेने इराणच्या अनेक भागात हल्ले सुरू केले.

होर्मुजजवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर पडल्यानंतर काही तासातच इराणवर हल्ले सुरू करण्यात आलीत. अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या महत्वाच्या ठिकाणी हल्ले करण्यास सुरूवात केली. क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरू आहेत. अमेरिकेने अब्बाससह इराणमधील तीन ठिकाणांवर एकाच वेळी हल्ले केले. ज्यानंतर पूर्ण इराणमध्ये स्फोटाचे आवाज झाले. अमेरिकेचे हे हल्ले सुरूच राहिले तर याला घातक पद्धतीने उत्तर देऊ, असे इराणने म्हटले. दुसरीकडे तेहरानमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलीये.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी