AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

60 वेळा आम्ही त्यांना इशारा दिला, 3 भारतीयांच्या मृत्यूनंतर अमेरिकेकडून मोठा खुलासा, थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध शेवटच्या टप्प्यात असताना अमेरिकेने मोठा हल्ला भारतीय जहाजावर केला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. भारताने या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली. शेवटी आता अमेरिकेने या हल्ल्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

60 वेळा आम्ही त्यांना इशारा दिला, 3 भारतीयांच्या मृत्यूनंतर अमेरिकेकडून मोठा खुलासा, थेट..
Indian ship attack
| Updated on: Jun 15, 2026 | 9:26 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध थांबले आहे. 14 युद्धविराम अटीवर शांतता करार झाला. 28 फेब्रुवारी 2o26 रोजी इराणवर मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेने केला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. यानंतर युद्ध भडकले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे युद्ध फक्त 4 आठवडे चालेल असे सांगितले. मात्र, त्यांचा अंदाज खोटा ठरला. इराण आणि अमेरिका युद्ध 3 महिन्यापेक्षा अधिक काळ चालले. युद्धाला सुरूवात होताच इराणने आपला मोर्चा थेट होर्मुज खाडीकडे वळवला. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. याचा थेट फटका बसला. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अमेरिकेकडून असंख्य प्रयत्न करण्यात आली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. होर्मुज खाडी जवळ अमेरिकेनेही मोठी तटबंदी केली. अमेरिकेच्या या तटबंदीमुळे तणाव अधिक वाढला. इराणच्या बंदराच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावर हल्ले केले जात होते.

24 भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर अमेरिकेने ओमानच्या आखातात मोठा हल्ला केला. या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. 3 भारतीय नागरिक ठार झाले. ज्यानंतर भारताने संताप व्यक्त केला. असे हल्ले अजिबातच सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले. यादरम्यानच आता अमेरिकेकडून या हल्ल्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले. नक्की काय घडले होते, हे अमेरिकेने सांगितले.

एका रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जहाजला अनेक वेळा पुढे न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर 24 पैकी 21 खुलाशांना वाचवण्यात यश आले. मात्र, आदित्य शर्मा, शिवानंद चाैरसिया आणि सुरेश पटनाला हे या हल्ल्यात ठार झाले. पलाऊचा ध्वज असलेले शेडो प्लीट टॅंकरला अमेरिकेने मिसाईलने टार्गेट करत हल्ला केला. अमेरिकेच्या सैन्याचे म्हणणे आहे की, 60 वेळापेक्षा जास्त वेळा आम्ही त्यांना चेतावणी दिली होती.

शेवटी 9 जूनच्या रात्री या जहाजाला अमेरिकेने निशाणा बनवत हल्ला केला. इराणी कच्च्या तेलाची तस्करी या जहाजाकडून केली जात होती. अनेकदा आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.अमेरिकेने त्यांना फायरिंगचीही वॉर्निंग दिली होती. तरीही जहाज थांबले नाही. हल्ला करण्यापूर्वी आम्ही त्यांना 15 मिनिटात क्रू ला इंजन रूमखाली करण्यासही सांगितले. त्यानंतर अमेरिकेच्या विमानाने थेट जहाजाच्या इंजन रूमला निशाना बनवत हल्ला केला. आता अमेरिकेकडून यावर स्पष्टीकरण दिले जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी