
व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, असं त्यागी समितीने म्हटलं आहे. तरीही लँड करण्यात आलं. अॅरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी होते. त्यामुळे अॅरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये अॅरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आलं पाहिजे.
काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. कालच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव दिलेलं नाही असं रोहित पवार म्हणाले.
हा व्हिडिओ पाहिल्यावर राईट बँक झालं नव्हतं. तर लेफ्टला पडलं होतं. रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. गोळी कुठे लागली, डोक्यात की पोटात लागली हे चुकीचं सांगितलं तर कसं होईल. या रिपोर्टमध्ये तेच चुकलं. या रिपोर्टमध्ये बेसिक निरीक्षण चुकीचं आहे असं रोहित पवार म्हणाले.
AAIB च निरीक्षण चुकलय असं आमचं सर्वांच मत आहे. चर्चा एका झाडाची आहे. रिपोर्टमध्ये ट्री सांगितलेत. विमान किती झाडांना अडकून खाली कोसळलं. झाडं नाही झुडूप आहे. झुडूपाला विमान टच सुद्धा झालं नव्हतं. झाडाला विमान धडकलं हे चुकीच आहे. रिपोर्ट द्यायचा म्हणून दिला असं रोहित पवार म्हणाले.
“मी VSR किंवा DGCA च्या विरोधात नाही. VSR कंपनीला कोणीतरी वाचवतय अशी शंका. DGCA तील अधिकाऱ्यांनाही कोणी वाचवतय का? रनवे 29 सेफ होता. तो दोनदा कॅन्सल केला. विमान आधी सूरतला गेलं होतं, हे अहवालात आलय” असं रोहित पवार म्हणाले.
जळगावातील नशिराबाद येथे महामार्गालगत असलेल्या सावन हॉटेलला भीषण आग लागली. मात्र कामगारांनी हॉटेलमधले 5-6 सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जळगाव व नशिराबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. शिवतीर्थ निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून वर्धापन दिनासंदर्भात ही बैठक असल्याचं समजतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
छत्रपती संभाजी नगर मध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी वाढली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार, पेट्रोल डिझेल बंद होणार अशा अफवा पसरल्याने पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
पार्थ पवार हे राज्यसभेसाठी उद्या अर्ज भरणार आहेत. तर मविआकडून शरद पवार यांचाही उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित करण्यात आली आहे. युएई गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून कालच्या फ्लाईटमधून विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक भारतात परतले.
नेमक्या भारतीय प्रवाशांची माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या टुरिस्ट कंपन्याकडून डेटा गोळा करण्यात आला आहे.
आखाती देशात युद्ध सुरू असल्याने पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा परभणी जिल्ह्यात पसरली होती. अफवा पसरल्याने वाहन धारकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली होती. बाटली, कॅनमधून वाहनधारक पेट्रोलचा साठा करत होते. टीव्ही 9 च्या बातमीनंतर पेट्रोल पंपावरील गर्दी कमी झाली. जिल्हधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बाटली, कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल देणं बंद झालं. जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा साठा असून आज सगळे पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.
इराणने युएईमधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला केला असून दूतावासाच्या आत एका मोठ्या स्फोटामुळे आग लागली आहे. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर बॉम्बहल्ला आजही सुरू आहे. तेहरानमधील आयआरजीसी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत.
अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम जळगाव जिल्ह्यातील केळींवर देखील झाला आहे. युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातले 100 पेक्षा अधिक केळीचे कंटेनर हे जीएनटीपी या ठिकाणी अडकलेले आहेत. रमजान महिन्यांमध्ये तब्बल दररोज 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशांमध्ये निर्यात होत असतात. मात्र युद्धामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. या महिन्यांमध्ये केळीला अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता, मात्र युद्धामुळे दर घसरले असून केवळ हजार ते पंधराशे रुपये पर्यंत आता दर मिळत आहे. निर्यात ठप्प झाल्याबरोबरच दुसरीकडे केळीचे दर देखील घसरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतोय.
पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित करण्यात आली आहे. युएई गव्हर्नमेंट, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कालच्या फ्लाइटमध्ये विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक भारतात परतले आहेत. नेमक्या भारतीय प्रवाशांची माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या टुरिस्ट कंपन्याकडून डेटा गोळा करण्यात आला आहे.
पुण्यातील 50 प्रवासी दुबईमधून परतले असून अडकलेल्या इतर प्रवाशांनाही लवकरात लवकर आणलं जाणार आहे. इस्रायल- इराण- अमेरिका युद्धामुळे दुबईत अनेक प्रवासी अडकले आहेत. पुणे महापालिकेकडून मदत कक्ष सुरू करण्यात आलंय. आतापर्यंत 170 जणांनी संपर्क केल्याची माहिती आहे. महापालिकेकडून गोळा झालेली माहिती जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार देण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिकेत मदत कक्ष उभा करून नागरिकांनी घाबरून न जाता संपर्क करण्याचा आवहान केलंय.
31 मार्चपासून नांदेड – गोवा आणि नांदेड – नागपूर विमानसेवा सुरू होणार आहे. 29 मार्चपासून नांदेड – बंगळुरू विमानसेवाही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. नांदेड विमानतळावरून आठ शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध असेल. भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी X वर पोस्ट करत माहिती दिली.
सर्वात सुरक्षित दुबईवर पहिल्यांदाच मोठा हल्ला. पहिल्यांदात दुबईवर एका मागून एक मोठी हल्ले. थेट खळबळ.
दुबईतील अमेरिकन दूतावास कार्यालयावर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याने अत्यंत मोठी खळबळ उडाली.
इराणी मीडियाने दावा केला की, तेहरानच्या विमानतळावर इराणकडून अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. तेहरानवरील हल्ल्याचा व्हिडीओ देखील पुढे आला.
इराणसोबच्या युद्धादरम्यान अमेरिकेने मोठी घोषणा केली असून अमेरिकेने म्हटले की, स्पेनसोबतचे सर्व व्यापार संबंध तोडणार आहे.
इराणकडून अमेरिकेच्या किनरवर मोठा हल्ला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अमेरिकेनेही इराणच्या प्रमुख ठिकाणांवर मोठे हल्ले केले.
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. सतत एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहे. इराणच्या मोठ्या शहरांना टार्गेट केले जात आहे. हे युद्ध पुढील चार ते पाच आठवडे चालेल असे अमेरिकेच म्हणणे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धाच्या पार्श्वभूमीवर 8 देशांसोबत चर्चा केली. इस्त्रायलचे पंतप्रधानांसोबतही त्यांनी फोनहून संवाद साधला. हे युद्ध थांबवण्याकरिता भारताकडून प्रयत्न केली जात आहेत. भारतात होणारी तेलाची आयात युद्धाच्या पार्श्वभूमीवर कमी झाली. 75 दिवस पुरेल इतका तेल साठा सध्या भारताकडे आहे. जर हे युद्ध असेच पुढे सुरू राहिले तर भारत अमेरिकेचा दबाव असतानाही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. मात्र, शाळा, मॉल, महाविद्यालय, दूतावास कार्यालय, विमानळे, लष्करी तळ यावर मोठे हल्ले केले जात आहेत. या युद्धाची प्रत्येक ताजी अपडेट, दोन्ही देशांच्या लष्करी हालचाली आणि भूमिका जाणून घेण्यासाठी आमच्या या लाईव्ह ब्लॉगला फॉलो करा.