अमेरिकेतून भारतीयांना बाहेरचा रस्ता? जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती, थेट म्हटले, एकही भारतीय नाही जो…
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत व्हिसाच्या नियमात बदल करताना दिसले. हेच नाही तर त्यांनी 88 लाख शुल्क H-1B व्हिसावर लावले. त्यामध्येच एका अमेरिकन नेत्याने भारतीयांबद्दल खळबळजनक विधान केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प H-1B व्हिसाच्या नियमात सतत बदल करताना दिसत आहेत. त्यांनी 88 लाख रूपये शुल्क या व्हिसावर लादले असून नियमात देखील काही बदल केली आहेत. H-1B व्हिसावर सर्वाधिक भारतीय लोक अमेरिकेत जावून नोकऱ्या करतात. अनेक कंपन्यांनी आपल्या H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना सध्याच अमेरिका न सोडण्याचा इशारा दिला. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच आता फ्लोरिडा राज्याचे गव्हर्नर चँडलर लँगेविन यांनी भारतीय लोकांबद्दल अत्यंत धक्कादायक विधान केले, ज्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीय लोकांना अमेरिकेतून काढण्याची विनंती केलीये.
भारतीय लोकांना अमेरिकेतून हद्दपार करा, असे विधान त्यांनी केल्याने खळबळ उडाली. आता सिटी कौन्सिलने त्यांना भारतीयांना हद्दपार करण्याबाबतच्या त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल चांगलेच फटकारले असून त्यांना आरसा दाखवण्याचे काम केले. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, सिटी कौन्सिलच्या निर्णयानुसार लँगेविनला कोणत्याही मुद्द्यामध्ये बोलताना एकमत निर्माण करावे लागेल. अजेंडा तयार झाल्याशिवाय ते बोलू शकणार नाहीत.
हेच नाही तर त्यांनी भारतीयांबद्दल केलेल्या धक्कादायक विधानानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचे असे भाष्य करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली. जर त्यांनी असे परत केले तर त्यांनी समित्यांमधून काढून देखील टाकले जाईल. सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये, फ्लोरिडाच्या कायदेकर्त्यांनी अमेरिकेतून भारतीयांना हद्दपार करण्याचे आवाहन थेट केल्याने एकच खळबळ उडाली. एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, मुळात म्हणजे अमेरिकेची काळजी करणारा एकही भारतीय नाहीये. ते (भारतीय) आमचे आर्थिक शोषण करतात आणि भारतीयांना समृद्ध करण्यासाठी येथे आहेत.
अमेरिका अमेरिकन लोकांसाठी आहे. सततच्या टीकेनंतर त्यांनी स्पष्ट म्हटले की, त्यांची टिप्पणी भारतीय अमेरिकन समुदायाबद्दल नाही तर तात्पुरत्या व्हिसा धारकांबद्दल होती. टीकेनंतर त्यांनी मोठी पलटी घेतल्याचे बघायला मिळाले. आता त्यांनी मी हे विधान तात्पुरत्या व्हिसा धारकांबद्दल केल्याचे थेट म्हटले. लँगेविनने भारतीयांवर अमेरिकेचा फायदा घेत असल्याचा थेट आरोप केला. सतत होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी मोठा यूटर्न घेतला. मात्र, ते सर्व भारतीयांबद्दल बोलताना दिसले. भारतीय लोकांमुळे अमेरिकन लोकांचे शोषणाचा देखील त्यांनी धक्कादायक दावा केला. थेट डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीय लोकांना अमेरिकेतून काढा त्यांनी म्हटले.
