AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक रशियात उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान, संपूर्ण युरोपमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?

US Russia Tensions : अमेरिकेचं एक मोठं लष्करी विमान C-17 ग्लोबमास्टर III अचानक मॉस्कोच्या वनुकोवो विमानतळावर उतरलं. यामुळे संपूर्ण युरोपात खळबळ उडाली आहे.

अचानक रशियात उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान, संपूर्ण युरोपमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?
us military c17 globemasterImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 25, 2026 | 9:27 PM
Share

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध ताणलेले असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. रशियाला एकटं पाडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्लादिमीर पुतिन यांच्या मित्र देशांवर टॅरिफचा दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण युरोपात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचं एक मोठं लष्करी विमान C-17 ग्लोबमास्टर III अचानक मॉस्कोच्या वनुकोवो विमानतळावर उतरलं. फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, या विमानाने लात्वियाची राजधानी रीगा येथून उड्डाण केलं आणि थेट मॉस्कोमध्ये लँडिंग केली. अमेरिकन लष्कराचं एवढं मोठं विमान मॉस्कोमध्ये नेमकं काय करत होतं, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मॉस्कोमध्ये उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान

फ्लाइटरडार24च्या आकडेवारीनुसार, या अमेरिकन लष्करी विमानाने RCH4555 या फ्लाइट क्रमांकाने उड्डाण केलं होतं. मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी सुमारे 8:50 वाजता विमानाने रीगा येथून उड्डाण केलं आणि सुमारे 10:04 वाजता मॉस्कोच्या वनुकोवो विमानतळावर लँडिंग केलं. वनुकोवो विमानतळाचा वापर रशियामध्ये अनेकदा व्हीआयपी आणि सरकारी मोहिमांसाठी केला जातो. या विमानाच्या लँडिंगची माहिती सोशल मीडिया आणि फ्लाइट ट्रॅकिंग अॅप्सवर समोर येताच चर्चेला सुरुवात झाली आहे.

जॉइंट बेस अँड्र्यूजमधून सुरू झालं होतं उड्डाण

या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वाची आहे. उपलब्ध डेटानुसार, हेच C-17 ग्लोबमास्टर विमान 23 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील मेरीलँडमधील कॅम्प स्प्रिंग्स येथून रीगाला पोहोचलं होतं. कॅम्प स्प्रिंग्स हे अमेरिकेच्या प्रसिद्ध जॉइंट बेस अँड्र्यूजजवळील ठिकाण आहे. जॉइंट बेस अँड्र्यूज हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरत असलेल्या अधिकृत विमान एअर फोर्स वन, तसेच उच्चपदस्थ अधिकारी आणि राजनैतिक मोहिमांच्या विमानांसाठी महत्त्वाचे तळ आहे. त्यामुळे या ठिकाणाहून निघालेलं विमान थेट मॉस्कोमध्ये पोहोचल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

रशियाकडून भाष्य नाही

या रहस्यमय लँडिंगबाबत रशियान सरकारला प्रश्न विचारण्यात आला. मात्र, प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मॉस्कोमध्ये या अमेरिकन लष्करी विमानाच्या आगमनाबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. रशियाच्या सरकारी माध्यमांनीही या आठवड्यात मॉस्कोमध्ये अमेरिकन प्रशासनातील कोणत्याही प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यासोबत अधिकृत बैठक निश्चित नसल्याचं म्हटलं आहे. दोन्ही देशांकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण न आल्याने या विमानाच्या लँडिंगबाबतचं गूढ आणखी वाढलं आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...