Donald Trump : व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करताना डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा मोठा दावा

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. त्यांनी भारतीय समुदायाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. अमेरिकी व्हाइट हाऊसमध्ये मागच्या काही वर्षांपासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरु झाली आहे. या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.

Donald Trump : व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करताना डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा मोठा दावा
Donald Trump
| Updated on: Oct 22, 2025 | 7:36 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. ट्रम्प यांनी भारतीय समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचा पुनरुच्चार केला. “मी भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. आमची खूप चांगली चर्चा झाली. आम्ही व्यापाराबद्दल बोललो” असा ट्रम्प यांनी दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रामुख्याने व्यापाराच्या मुद्यावर चर्चा झाल्याच ट्रम्प म्हणाले. व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा केली. पण जास्त करुन व्यापारी विषयावर बोललो” ‘भविष्यात भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणार नाही’ असा मोठा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केला.

क्षेत्रीय शांततेबाबत मोदींसोबत संक्षिप्त चर्चा झाल्याच ट्रम्प म्हणाले. “मी याआधी सुद्धा भारत आणि पाकिस्तान दोघांना संघर्ष टाळण्याच आवाहन केलं आहे. पाकिस्तानसोबत कुठलही युद्ध नको या विषयी आम्ही काही वेळापूर्वी बोललो” असं ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान मोदींसोबतच्या आठवणींना ट्रम्प यांनी यावेळी उजाळा दिला. “मोदींसोबत अनेक वर्षांपासूनचे जुने संबंध आहेत. ते एक महान व्यक्ती आणि मित्र आहेत” असं सांगताना ट्रम्प यांनी मोदींच भरभरुन कौतुकही केलं. भारताने ट्रम्प यांच्या नव्या दाव्यांना दुजोरा दिलेला नाही.

खरचं फोन कॉल झाला का?

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्याभरापूर्वी सुद्धा असाच दावा केला होता. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो. त्यांनी मला आश्वासन दिलय की, रशियाकडून तेल खरेदी बंद करणार’ असं ट्रम्प म्हणालेले. रशिया-युक्रेन युद्ध रोखण्याच्या दृष्टीने हे एक मोठा प्रयत्न असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. कारण भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करतो. त्यातून रशियाला आर्थिक लाभ मिळत असल्याने युद्ध सुरु ठेवण्यासाठी पुतिन यांना बळ मिळतं असा ट्रम्प यांचा अजब तर्क आहे. त्यामुळे रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे. भारताने मागच्या आठवड्यातच ट्रम्प यांचे हे दावे खोडून काढले होते. अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये कुठलाही फोन कॉल झालेला नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.