
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे अजब रसायन आहे, हे आता उभ्या अमेरिकेलाच नाहीतर जगाला माहिती झालं आहे. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार आपल्यालाच द्यावा असा त्यांचा पराकोटीचा हट्टहास आहे. या पुरस्कारासाठी ते नादावले आहेत. हा पुरस्कार न दिल्यास तो अमेरिकेचा घोर अपमान असेल असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे निवड समिती दबावाखाली असल्याचे दिसून येते. ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize 2025) देणे शक्य नसेल तर निदान नोबेल नावाची ट्रॉफी तरी नॉर्वे सरकारने देणे गरजेचे आहे. तरच जगात शांतता नांदू शकेल, असे मिश्किल प्रतिक्रिया आणि मत सोशल मीडियावर उमटत आहेत. नोबेल पुरस्कारांची घोषणा नोबेल...