AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने उडवली जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती धुपाटणे, भारतानेही थेट…

मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्व देशांना टॅरिफच्या धमक्या देत आहेत. त्यांनी मोठा टॅरिफ भारतावर लावला. मात्र, त्यांच्या टॅरिफमुळे फार काही परिणाम झाला नाही. आता चीनने अमेरिकेला थेट मोठा धक्का दिला.

चीनने उडवली जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती धुपाटणे, भारतानेही थेट...
China America
| Updated on: Dec 14, 2025 | 9:56 AM
Share

अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच चीनवर 1 नोव्हेंबर 2025 पासून 100 टक्के टॅरिफ लावला जाईल, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर चीन आणि अमेरिकेत महत्वाचे करार झाले आणि चीनवरील अतिरिक्त टॅरिफ टळला. मात्र, भारतावर 50 टक्के टॅरिफ कायम आहे. भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावताना अमेरिकेने कारण दिले होते की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही त्यांच्यावर टॅरिफ लावत आहोत. मात्र, जगात सर्वाधिक रशियाकडून तेल खरेदी चीन करतो. भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. आता चीनच्या व्यापार शिलकीने प्रथमच 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. याचा अर्थ स्पष्ट असा की, चीनची निर्यात त्याच्या आयातीपेक्षा 1 ट्रिलियन डॉलर्सने जास्त आहे. आज जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीन बनू शकला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कांनंतरही चीनमधून इतर देशांना होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीत  वाढ झाली आहे. अमेरिकेने आपली व्यापार तूट कमी करण्याच्या प्रयत्नात या वर्षाच्या सुरुवातीला बहुतेक देशांवर मोठ्या प्रमाणात प्रतिशोधात्मक शुल्क लादले. गेल्या काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका एकमेकांच्यापुढे उभी आहे. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफ विरोधात चीन मैदानात उतरला होता.

हेच नाही तर भारतासोबत महत्वपूर्ण काही करारही चीनने केले. रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि नरेंद्र मोदी चीनच्या दाैऱ्यावर गेले होते. यावेळी तीन महाशक्तींना एकत्र आल्याचे पाहून अमेरिकेचा थयथयाट चांगलाच झाला होता. चीनने इतर बाजारपेठांमध्ये निर्यात वाढवून आपली ताकद दाखवून दिली. ज्यामुळे हे सिद्ध झाले की ते अमेरिकेच्या शुल्कांमुळे निर्माण झालेल्या सुरुवातीच्या आव्हानांवर मात करू शकतात.

हे शुल्क 145 टक्क्यांपर्यंत होती. मात्र, व्यापार करारादरम्यान अमेरिकेने चीनवरील टॅरिफ कमी केला. भारताकडून देखील तेच केले जात आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर इतर पर्याय शोधली जात आहेत. भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार देखील केला आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही. भारताने इतर देशांसोबत व्यापार वाढवला आहे.

गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.