
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी त्यांच्याकडे एक योजना तयार आहे. त्यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांना युक्रेनियन अधिकाऱ्यांकडे पाठवत आहेत. ते स्वत: देखील बोलतील. मात्र, या प्रस्तावाबद्दल दोन्ही देशांचे काय म्हणणे आहे, त्यावेळीच. रात्री उशिरा अबू धाबीमध्ये लष्कर सचिव ड्रिस्कॉल यांनी रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे आणि आम्ही आशावादी आहोत, असे लष्कर सचिवांचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जेफ टॉल्बर्ट म्हणाले. मात्र, चर्चा सुरू असतानाच रशियाने रात्रीच्या वेळी कीववर क्षेपणास्त्र हल्ले केले.
त्यामध्येच रशिया युक्रेन युद्ध थांबेल, असा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या ट्रम्प यांच्या शांतता योजनेचे वर्णन रशिया समर्थक म्हणून करण्यात आले होते. ज्यामुळे झेलेन्स्की यांनी तातडीने अमेरिकन वाटाघाटी करिता भेट घेतली. युरोपीय देशांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आता अमेरिकेने त्यानंतर तातडीने दुसरा प्रस्ताव तयार केला. पहिल्या प्रस्तावाला रशियाने हिरवा झेंडा दाखवला होता.
मागील काही दिवसांपासून रशियावर मोठा दबाव अमेरिकेचा आहे. रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. मात्र, रशिया अमेरिकेपुढे अजिबात झुकत नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. हेच नाही तर रशियासोबत व्यापार न करण्यासाठी जगातील अनेक देशांवर अमेरिकेचा दबाव बघायला मिळत आहे. अमेरिका आता जरी हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा युद्ध थांबल्याचे सांगत आहे.
सुरूवातीच्या काळात रशिया युक्रेन युद्ध अमेरिकेनेच पेटवले. हेच नाही तर युक्रेनला रशियाच्या विरोधात लढण्यासाठी शस्त्रे दिली. आता अमेरिका युद्ध संपल्याचा दावा करत आहे. रशिया आणि युक्रेनच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे.