AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आदेश, या देशातील नागरिकांच्या अमेरिकेत वाढल्या समस्या, धोरण..

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. त्यामध्येच आता त्यांनी थेट अफगाणिस्तान नागरिकांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊसच्या जवळ झालेल्या हल्ल्याला त्यांनी दहशतवादी हल्ला म्हणून घोषिक केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आदेश, या देशातील नागरिकांच्या अमेरिकेत वाढल्या समस्या, धोरण..
Donald Trump
| Updated on: Nov 28, 2025 | 7:28 AM
Share

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ मोठा हल्ला झाला. थेट नॅशनल गार्डच्या सैनिकांवर गोळीबार झाला. या हल्ल्यात आता एका सैनिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृत सैनिक सारा बॅकस्ट्रॉम यांना श्रद्धांजली वाहिली. हेच नाही तर दुसऱ्या जखमी सैनिकाची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. एका अफगाण नागरिकाने हा हल्ला केला. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून तो देखील हल्ल्यानंतर जखमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर लगेचच हा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नॅशनल गार्डच्या निधनाची बातमी कळताच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी या हल्ल्याचे वर्णन दहशतवादी हल्ला म्हणून केले.

हा वाईट, द्वेष आणि दहशतीतून घडलेला गुन्हा असल्याचे स्पष्ट म्हटले. रिपोर्ट्सनुसार, संशयिताचे नाव रहमानउल्लाह लकनवाल असे आहे, 2021 मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेत आला होता. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याला मदत करणाऱ्या लोकांसाठी खास व्हिसा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळीच अमेरिकेत रहमानउल्लाह लकनवाल आला होता. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी त्याचा अमेरिकेचा व्हिसा संपला होता. मात्र, तरीही तो अमेरिकेत राहत होता.

आता या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान नागरिकांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली. ट्रम्प यांनी घोषणा केली की अफगाणिस्तानातून येणाऱ्या सर्व लोकांची पुन्हा तपासणी केली जाईल आणि ज्यांना अमेरिकेवर प्रेम नाही त्यांना हद्दपारीचा विचार केला जाईल. अमेरिकेने अफगाणिस्तानातून स्थलांतर स्थगित केले आहे. धोरण बदलाची घोषणा करत USCIS ने म्हटले आहे की, तात्काळ सुरक्षा आणि स्क्रीनिंग प्रोटोकॉलचा अधिक आढावा घेतला जाईल.

अफगाण नागरिकांशी संबंधित सर्व इमिग्रेशन विनंत्या 2020 पर्यंत अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. हेच नाही तर अमेरिकन लोकांची सुरक्षा सर्वात महत्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले. आता या हल्ल्यानंतर वॉशिंग्टनमध्ये सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. हेच नाही तर अमेरिकेत राहणाऱ्या अफगाणिस्तान नागरिकांची चाैकशी केली जाईल आणि त्यांच्या व्हिसाचीही तपासणी केली जाईल.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.