AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यानंतर थेट अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षात मोठी बंडखोरी, तब्बल..

अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात जगाची वाट लागली. या युद्धाचे परिणाम तीन देशांपुरते मर्यादित राहिले नाही. अख्ख्या जगाला या युद्धाचे परिणाम भोगावी लागली. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतूनच दणका बसत आहे.

उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यानंतर थेट अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षात मोठी बंडखोरी, तब्बल..
Donald Trump
| Updated on: Jun 24, 2026 | 2:00 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबला आहे. तब्बल 3 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू होते. या युद्धाचा थेट जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला. कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढताना दिसले. या युद्धमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्ध थांबवण्याकरिता मोठा दबाव होता. अनेकांनी थेट त्यांच्यावर टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार व्हावेत याकरिता प्रयत्न केला. कारण युद्धात इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला. अनेक देशात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली. युद्धविराम झाल्यानंतर इराणने होर्मुज खाडी सुरू केली. इराणभोवती मोठ्या प्रमाणात नाकेबंदी अमेरिकेने केली होती. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसताना दिसत आहे.

अमेरिकन काँग्रेसचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटने एका ठरावाला मंजुरी दिली. या ठरावाद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पक्षातील लोकप्रतिनिधींनीही या ठरावाला पाठिंबा दिला. अमेरिकेतूनही इराणसोबतच्या युद्धाला विरोध होत होता. या युद्धामुळे अमेरिकेत महागाई प्रचंड वाढली.

ज्याप्रमाणे भारतात ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमधील खासदारांनी बंड केले, त्याचप्रमाणे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षालाही स्वतःच्याच लोकप्रतिनिधींमुळे अडचणींचा सामना करावा लागला. थेट सरकारविरोधात अमेरिकेतीलही खासदार जाहीरपणे विरोधात भूमिका घेत आहेत. इराणसोबतच्या युद्धात थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील लोक जात आहेत.

युद्धविषयक अधिकारांबाबतच्या ठरावाला सिनेटमध्ये 50 मते मिळाली, 48 मते त्याच्या विरोधात पडली. हा डोनाल्ड ट्रम्प  यांना दणका आहे. अमेरिकेने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला होता. ज्यामध्ये त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे युद्ध इतके जास्त भडकले की, त्याचा जगाला परिणाम भोगावा लागला.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा