आता माझा संयम संपला… डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, संपूर्ण जगाचं अमेरिकेकडं लक्ष

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे, ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेकडे लागलं आहे.

आता माझा संयम संपला... डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, संपूर्ण जगाचं अमेरिकेकडं लक्ष
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 13, 2025 | 7:36 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियाला थेट इशारा दिला आहे, आता माझा संयम सुटला असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना म्हटलं आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की, पुतिन यांनी अजूनही आपल्या देशातून युक्रेनवर होणारे हल्ले थांबवले नाहीत, किंवा हल्ले थांबवले जातील याबाबत कोणतेही संकेत देखील दिलेले नाहीत. ते फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हटलं ट्रम्प यांनी?

या मुलाखतीमध्ये बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, आता माझा सयंम सुटला आहे, पुतीन यांनी अजूनही आपल्या देशातून युक्रेनवर होणारे हल्ले थांबवलेले नाहीत, किंवा हल्ले थांबवले जातील याबाबत त्यांनी कोणतेही संकेत दिलेले नाहीत. युद्धविरामासाठी दोन्ही देशांची सहमती आवश्यक असते. जेव्हा पुतिन तयार होते तेव्हा झेलेंस्की तयार नव्हते, आणि आता झेलेंस्की तयार आहेत तर पुतिन तयार होत नाहीत, त्यामुळे मला आता असं वाटत आहे की, माझा संयम संपला असून, कडक पाऊलं उचलण्याची वेळ आली आहे, असं ट्रम्प यांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे रशियानं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, युक्रेनसोबत सुरू असलेली युद्धविरामाची चर्चा सध्या थांबली आहे. दोन्ही देश युद्धविरामाच्या चर्चेसाठी तयार आहेत, मात्र युरोपीयन देश आणि अमेरिका त्यामध्ये अडथळा निर्माण करत आहेत.युरोपीयन देशांकडून एकीकडे युद्धविरामासाठी नाटक केलं जात आहे, तर दुसरीकडे मात्र युक्रेनला अत्याधुनिक शस्त्र आणि सैन्यांचा पुरवठा केला जात आहे, त्यामुळे शांततेची चर्चा पुढे जात नसल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. तर आता रशियानं युद्धविरामासाठी पुढाकार न घेतल्यास त्यांच्यावरील निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीमध्ये अमेरिका आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या संदर्भात नाटो देशांना देखील आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान ट्रम्प हे गेल्या अनेक दिवसांपासून युद्धविरामासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या या प्रयत्नाला अद्याप तरी म्हणावं असं यश आलेलं नाहीये, त्यामुळे आता ट्रम्प काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.