डोक्यात चमक उठवणारे डोनाल्ड ट्रम्प यांचे शब्द, भारताला धक्का, थेट पाकिस्तानचे..

US-Iran Ceasefire : इराण आणि अमेरिका युद्धात संघर्ष पेटला आहे. या युद्धात दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. ही युद्धबंदी उठण्याकरिता काही तास शिल्लक असतानाच अमेरिकेकडून मोठी घोषणा करण्यात आली. अमेरिकेने इराणवर हल्ला करणार नसल्याची भूमिका घेतली. युद्धबंदीला मुद्दत वाढ दिली.

डोक्यात चमक उठवणारे डोनाल्ड ट्रम्प यांचे शब्द, भारताला धक्का, थेट पाकिस्तानचे..
Donald Trump
| Updated on: Apr 22, 2026 | 8:46 AM

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या युद्धात अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे येत नाही. युद्ध अंगलट येताना दिसत असताना अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या हाताशी धरले. पाकिस्तान युद्धात मध्यस्थी करत आहे. मंगळवारी इराण आणि अमेरिकेत शांतता करार बैठक होतील. अमेरिका बैठकीसाठी तयार होती. पाकिस्तानमध्ये या बैठकीची जोरदार तयारी सुरू होती. रेड झोन जाहीर करण्यात आला. हेच नाही तर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. लोकांना घराबाहेर निघण्यासही परवानगी नव्हती. मात्र, इराणकडून पाकिस्तानच्या हातावर तुरी देण्यात आला. इराणने होर्मुज खाडीत त्यांचे मालवाहू जहाज अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर बैठकीस दाखल होण्यास नकार दिला. हेच नाही तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, धमक्या दिल्या जात आहेत, अशा स्थितीत आम्ही बैठकीस बसण्यास तयार नाहीत. इराणने बैठकीस येण्यास नकार दिल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा युटर्न घेतला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही विशिष्ट कालावधीशिवाय इराणसोबतचा शस्त्रसंधी अचानक वाढवण्याची घोषणा केली. शांतता करार बैठकीस येण्यास इराणने नकार दिल्यानंतर इराणवर दोन आठवड्यांची युद्धबंदी उठल्यानंतर मोठे हल्ले अमेरिका करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यांनी थेट इराणवर हल्ला करणार नसल्याची घोषणा केली. शस्त्रसंधी संपण्याच्या काही तास आधीच हा निर्णय घेण्यात आला.

व्हाईट हाऊसमध्ये आपल्या राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले. अमेरिका युद्धबंदी करारासाठी तयार आहे. मात्र, इराणकडून काही अटी ठेवण्यात आल्या.  शस्त्रसंधी असताना आमच्या जहाजावर हल्ला होर्मुज खाडीत करण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. शिवाय सतत अमेरिकेकडून या कराराच्या मुद्द्यावर धमकावले जात आहे.

हे सुरू असताना बैठकीस बसणे शक्य नसल्याचे इराणकडून सांगण्यात आले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प थेट पाकिस्तानचे काैतुक करताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांचे शब्द ऐकून भारताच्या डोक्यात गेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की,  पाकिस्तानच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी अमेरिकेला हल्ला स्थगित करून राजनैतिक चर्चा होऊ देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला.

Follow Us