जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प सर्वात भयानक हल्ला करणार, गुप्त रिपोर्टने खळबळ

Donald Trump: अमेरिकन वृत्तपत्र मियामी हेराल्डमधील एका रिपोर्टने जगाची झोप उडाली आहे. यातील रिपोर्टनुसार अमेरिकेने व्हेनेझुएलातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प सर्वात भयानक हल्ला करणार, गुप्त रिपोर्टने खळबळ
Donald Trump Army
| Updated on: Nov 01, 2025 | 10:39 PM

अमेरिकेच्या निर्णयांमुळे गेल्या काही दिवसांपासून जगातील सर्वच देशांचे टेन्शन वाढले आहे. अशातच आता अमेरिकन वृत्तपत्र मियामी हेराल्डमधील एका रिपोर्टने जगाची झोप उडाली आहे. यातील रिपोर्टनुसार अमेरिकेने व्हेनेझुएलातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला पुढील काही तासांत किंवा काही दिवसांत सुरू होण्याचीही शक्यता आहे. व्हेनेझुएलातील ड्रग कार्टेलच्या नेत्यांना संपवण्यासाठी हे हल्ले केल्या जाणार असल्याचे समोर आले आहे, मात्र अमेरिकन सरकारने हा दावा नाकारला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे?

मियामी हेराल्डने 31 ऑक्टोबर रोजी ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी दिली आहे. हे तळ ‘सोल्स कार्टेल’ वापरतात. कार्टेल ड्रग्ज तस्करीत सामील आहे आणि त्याचा नेते मादुरो आणि इतर सहकाऱ्यांवर हल्ला करण्याची योजना आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाचे लष्करी तळ आणि ज्या बंदरांमधून ड्रग्जची तस्करी केली जाते अशी बंदरांवर हल्ला होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेकडून होणारे हे हल्ले हवाई आणि नौदलाद्वारे केले जाणार आहे. कार्टेलच्या नेत्यांना ठार करण्यासाठी हे हल्ले केले जाणार आहे. हे कार्टेल दरवर्षी युरोप आणि अमेरिकेत 500 टन कोकेन पाठवते. सूत्रांच्या माहितीनुसार मादुरोचे आता अंतिम काही दिवस शिल्लक आहेत. तो आता पळून जाऊ शकणार नाही, कारण त्याला पकडण्यासाठी अनेक जनरल तयार आहेत. त्यामुळे आता अमेरिकन सैन्य त्याचा खात्मा करणार असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या कार्टेलने व्हेनेझुएलाच्या सैन्यात घुसखोरी केली आहे. अमेरिकेने मादुरोवर 50 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. तसेच त्याचे सहकारी डिओसदाडो कॅबेलो आणि व्लादिमीर पॅड्रिनो लोपेझ यांच्यावरही प्रत्येकी 25 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस आहे. यूएस अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी मादुरोचा उल्लेख कार्टेलचा प्रमुख असा केला आहे, आता त्याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने तयारी केली आहे.

अमेरिकेने कॅरिबियन समुद्रात सैन्य वाढवले

अहवालानुसार, अमेरिकेने कॅरिबियन समुद्रात आपले सैन्य वाढवले ​​आहे. तसेच सप्टेंबर 2025 पासून अमेरिकेने अनेक हल्ले केले आहेत, ज्यामध्ये 61 संशयित तस्करांचा मृत्यू झाला आहे. सध्या कॅरिबियनमध्ये एकूण 10000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात आहे. तसेच नौदलाच्या आठ युद्धनौका आणि इतर जहाजे तैनात आहेत. तसेच प्यूर्टो रिकोमधील सेइबा हवाई तळावर दहा F-35B लढाऊ विमाने तैनात आहेत. यूएसएस जेराल्ड आर. फोर्डमध्ये अंदाजे 90 लढाऊ विमाने आहेत. त्यामुळे या रिपोर्टमधील माहिती खरी असल्याचे बोलले जात आहे, मात्र अमेरिकन सरकारने हे वृत्त फेटाळले आहे.