
अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम ( Lindsey Graham ) यांनी भारतासह चीन आणि ब्राझील या देशांना थेट धमकावले आहे. रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करणाऱ्या देशांवर आगपाखड करीत लिंडसे ग्रॅहम यांनी चीन, भारत आणि ब्राझील यांना ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाचा कठोर सामना करावा लागू शकतो. फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत ग्रॅहम यांनी म्हटले आहे की ट्रम्प आता रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या विरोधात उदा. चीन, भारत आणि ब्राझील यांच्यावर टॅरिफ लावणार आहेत.
रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल ( Russia Oil ) खरेदी करणाऱ्या या तीन देशांची हिस्सेदारी सुमारे ८० टक्के आहे. ग्रॅहम यांचा तर्क असा आहे की या देशांचा सातत्याचा व्यापार हा व्लादिमीर पुतीन यांच्या युद्धाला प्रोत्साहन देत आहे. युक्रेनमध्ये संघर्ष समाप्त करण्याच्या प्रयत्नाला हा व्यापार कमजोर करीत आहे. अमेरिकन सिनेटर यांनी उत्साहाच्या भरात जर भारत, चीन आणि ब्राझील रशियाकडून तेल खरेदी कायम ठेवेल तर त्यांना आम्ही बरबाद करू.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की,’ मी चीन, भारत आणि ब्राझील यांना हे सांगेन की जर तुम्हा या युद्धाला सुरु ठेवण्यासाठी स्वस्तात रशियाकडून तेल खरेदी करत राहाल, तर आम्ही तुम्हाला बरबाद करु आणि तुमच्या अर्थव्यवस्थेला बरबाद करु, कारण तुम्ही ते करत आहात तो रक्ताचा पैसा आहे.’
आपल्या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले की ट्रम्प प्रशासन निर्णायक कारवाई करण्यासाठी तयार आहे. आणि पुतीन यांना १४ जुलैपर्यंत सैन्य मोहिम रोखण्यासाठी ५० दिवसांचा अल्टीमेटम दिलेला आहे. अन्यथा कठोर प्रतिबंधांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे तेल खरेदी संदर्भात रशियाच्या अर्थलव्यवस्थेला सहकार्य करणाऱ्या देशांवर दंड लावणेही सामील आहे. ग्रॅहम यांनी म्हटले की पुतीन आता तुमची वेळ येत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन धोरण आणि विदेशी नितीचे स्कॉटी शेफलर आहेत आणि ते तुम्हाला वाईटरित्या हरवतील.
अमेरिकेने रशियन तेल खरेदीदारांवर 500 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव ठेवण्याचे विधेयक सध्या अमेरिकेच्या सिनेटमध्ये प्रलंबित आहे.
परंतू,ग्रॅहम यांचे वक्तव्य परराष्ट्र व्यापार आणि युद्धकालीन फंडींगवर आक्रमक धोरण म्हणून पाहिले जात आहे. त्यांनी या बाबीवर जोर देत सांगितले की अमेरिकन शस्रास्रं युक्रेन यांना मिळत राहतील आणि इराणवर इस्रायली हल्ल्यांसाठी ट्रम्प यांच्या पाठींब्यांचा बचाव करताना दावा केला आहे की यामुळे तहरानच्या आण्विक महत्वाकांक्षाला मोठा धक्का लागला आहे. चीन आणि भारत रशियाचे सर्वात मोठे तेल खरेदीदार आहेत. अशात ग्रॅहम याच्या या वक्तव्याने जगातल्या काही वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांसोबत अमेरिकेचा संघर्ष होण्याची शक्यता आहे.