US-Iran : जगात खळबळ ! इराण- अमेरिकेचं पुन्हा बिनसलं? US चा पुन्हा मोठा हल्ला, होर्मुजचा बदला घेत…

US Iran Conflict: होर्मुजच्या सामुद्रधुनीतल एका व्यावसायिक जहाजावरील ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिका हादरली. त्यानंतर अमेरिकेन मोठी कारवाई करत इराणला मोठा झटका दिला.

US-Iran : जगात खळबळ ! इराण- अमेरिकेचं पुन्हा बिनसलं? US चा पुन्हा मोठा हल्ला, होर्मुजचा बदला घेत...
अमेरिकेन इराणचा घेतला बदला
| Updated on: Jun 27, 2026 | 8:06 AM

US Iran Conflict : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मध्ये एका व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, अमेरिका चांगलीच भडकली असून यूएसने इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई केली आहे. इराणच्या आगळिकीनंतर प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले केल्याचा दावा अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) केला आहे. व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं.

अमेरिकन लष्कराने 26 जून रोजी इराणविरुद्ध प्रत्युत्तरादाखल हल्ले केले, असं. या निवेदनानुसार, ‘सेंटकॉम’ने (CENTCOM) ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. ही कारवाई 25 जून रोजी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मध्ये ओमानच्या किनारपट्टीजवळून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर करण्यात आलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली.

मिसाईल्स, ड्रोन केंद्र आणि रडार साईट्स निशाण्यावर

आम्ही इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक केंद्रांवर तसेच किनारी रडार केंद्रांवर हल्ला केला, असं अमेरिकेच्या लष्करातर्फे सांगण्यात आलं. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, सिंगापूरचा ध्वज असलेल्या ‘एम/व्ही एव्हर लवली’ हे मालवाहू जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडत असताना एका एकतर्फी हल्ला करणाऱ्या ड्रोनने हल्ला केला होता. इराणी सैन्याने व्यापारी जहाजावर केलेला हल्ला पूर्णपणे अन्यायकारक आणि शस्त्रसंधी कराराचे स्पष्ट उल्लंघन असल्याचं सेंटकॉमने म्हटलं आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांसाठी अमेरिकन लष्कर समन्वय साधणे आणि त्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे सुरूच ठेवणार असल्याचं सेंटकॉमने (CENTCOM) स्पष्ट केलं. इराणसोबत झालेल्या कराराची पूर्णपणे अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आपली फौज या भागात पूर्णपणे सतर्क आणि तैनात असल्याचे अमेरिकेने नमूद केलं आहे.
ब्रिटनने जहाजावरील हल्ल्याची केली पुष्टी

ओमानच्या किनारपट्टीजवळ एका कंटेनर जहाजावर क्षेपणास्त्र किंवा तत्सम वस्तूचा (प्रोजेक्टाइल) मारा झाल्याचे ब्रिटिश लष्कराने गुरुवारी सांगितल. मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, अशी माहिती ‘युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ केंद्राने दिली होती.

IMO कडून जहाजांना बाहेर काढण्याची प्रक्रिया स्थगित

मात्र या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) पर्शियन आखातात अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली. अन्य जहाजांच्या सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार नाही, असं संघटनेने स्पष्ट केलं. IMO चे सरचिटणीस अर्सेनियो डोमिंग्वेझ यांनी माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत सुमारे 115 जहाजे या सामुद्रधुनीतून मार्गस्थ झाली असली तरी अजूनही सुमारे 500 जहाजं या भागात आहेत.

हल्ल्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे टीकास्त्र

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजावरील हल्ल्याचे वर्णन ‘युद्धविराम कराराचे मूर्खपणाचे उल्लंघन’ असं वर्णन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी केलं होत. जहाजाच्या दिशेने सोडलेल्या चारपैकी एका ड्रोनमुळे जहाजाच्या वरच्या भागाचे नुकसान झाले, तरीही ते जहाज आपला प्रवास सुरू ठेवू शकले असं ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिलं. अमेरिकी सैन्याने उर्वरित तीन डोन्स पाडल्याचंही त्यांनी नमूद केलं.

इराणला इशारा

या ड्रोन हल्ल्यानंतर इराणला याची किंमत भोगावी लागेल का असा प्रश्न ट्र्म्प यांना विचारण्यात आला होता. , “तुम्हाला लवकरच समजेल” असं ते यावर म्हणाले होते. इराणने त्या जहाजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट अजबात आवडली नसल्याचंही ट्रम्प म्हणाले. “त्यांनी चार ड्रोन पाठवले होते, त्यापैकी तीन आम्ही पाडले. त्यांनी (इराण) तसं करायला नको होतं. आता पुढे काय होतं, हे तुम्हाला लवकरच समजेल ” असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us