डोनाल्ड ट्रम्प यांना जे हवे ते मिळालेच… परराष्ट्र सचिवांचा थेट मोठा दावा, कच्चा तेलाच्या…
अमेरिकेने मोठी कारवाई करत थेट व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांनाच अटक केली. ज्यानंतर जगात खळबळ उडाली. आता त्यानंतर अमेरिकेकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला असून त्यांनी जगापुढे व्हेनेझुएलाबद्दलची भूमिका स्पष्ट केली.

व्हेनेझुएलाच्या थेट अध्यक्षांनाच अमेरिकेने अटक केल्याने मोठी खळबळ उडाली. व्हेनेझुएलावर अगोदर हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला आणि त्यानंतर मादुरो यांना त्यांच्या पत्नीसह अटक करण्यात आली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी नुकताच अत्यंत मोठे संकेत दिले आहेत. व्हेनेझुएला आता अमेरिकेच्या हातात गेला. तेल निर्बंध लादण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर अमेरिका व्हेनेझुएलाचा कारभार हाती घेणार असे सांगितले जात होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून निकोलस मादुरो यांना धमक्या देताना दिसत होते. शेवटी अगोदर त्यांनी व्हेनेझुएला हल्ला करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर थेट मादुरो यांना अटक करण्यात आली आणि अमेरिकेत आणण्यात आले. मादुरो यांना आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेत अटक करून अज्ञात स्थळी ठेवण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका सध्या व्हेनेझुएलाचा कारभार सांभाळेल. जोपर्यंत सत्तेचे सुरक्षित व सुव्यवस्थित हस्तांतरण होत नाही, तोपर्यंत अमेरिका हे काम करेल. त्यानंतर आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानावर स्पष्टीकरण दिले असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाची चुकीचा अर्थ काढला गेल्याचे त्यांनी म्हटले. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले की, ट्रम्प यांच्या विधानाचा एक वेगळा अर्थ लावला.
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर राज्य करण्याचा कोणताही विचार नाही. ट्रम्प यांचा थेट नियंत्रणाचा अर्थ नव्हता. रुबियो यांनी स्पष्ट केले की, अमेरिका व्हेनेझुएलाविरुद्धची तेलबंदी सुरूच ठेवेल. निर्बंध घातलेल्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य करणे आणि ती जप्त करणे, हे अमेरिका पूर्वीप्रमाणेच करेल. त्यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेची इच्छा आहे व्हेनेझुएलाचा तेल उद्योग देशाच्या लोकांच्या हितासाठी काम करावा. त्यांनी अंमली पदार्थांची तस्करी थांबवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी म्हटले.
अंमली पदार्थांची तस्करीवरूनच डोनाल्ड ट्रम्प आणि मादुरो यांच्यात वाद सुरू होता. मादुरो यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आरोप केली जात होती. त्यांनी अंमली पदार्थांची तस्कारी थांबवावी, अशी सातत्याने चेंतावणी अमेरिकेकडून दिली जात होती. मात्र, असे म्हटले जाते की, अंमली पदार्थ विषय फक्त जगाला दाखवण्यासाठी अमेरिकेला व्हेनेझुएलाचा तेलाचा कारभार हाती पाहिजे होता आणि त्यांनी तो मिळवला आहे.
