AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai 26/11 Attack : अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात मोठा विजय, मुंबई 26/11 च्या हल्लेखोराला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

Mumbai 26/11 Attack : मुंबईवरील 26/11 हल्ल्याशी संबंधित एका मोठा आरोपी अमेरिकन तुरुंगात बंद आहे. त्याचा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारताचा मोठा विजय झाला आहे.

Mumbai 26/11 Attack : अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात मोठा विजय, मुंबई 26/11 च्या हल्लेखोराला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा
court
| Updated on: Jan 25, 2025 | 9:59 AM
Share

मुंबईवर 2008 साली 26/11 चा भीषण हल्ला झाला होता. आजही मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून ताज हॉटेलसह अन्यत्र अंदाधुंद गोळीबार केला होता. आजही या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. तिथे आरामात आयुष्य जगत आहेत. याच हल्ल्यातील एक आरोपी तहव्वुर राणा अमेरिकन तुरुंगात बंद आहेत. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे. एकप्रकारे अमेरिकी कोर्टात भारताचा हा मोठा विजय आहे. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेच्या सत्र न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यर्पण करारातंर्गत तहव्वुर राणाला भारतात पाठवण्याचा आदेश दिला होता. सत्र न्यायालयाने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा केला होता. पण राणाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर लगेच शुक्रवारी याबाबत निर्णय झाला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली. तहव्वुर राणाला आता भारतात आणलं जाईल. त्याच्यावर इथे खटला चालेल. 26/11 हल्ल्यातील त्याचा रोल काय? कारस्थान कसं रचलं? या सगळ्याची चौकशी होईल.

त्याला भारतात आणून चौकशी करणं खूप महत्त्वाचं, कारण….

तहव्वुर राणावर आरोप आहे की, त्याने 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केली होती. हेडलीच्या इशाऱ्यावर तो संपूर्ण कट अमलात आणत होता. राणा डेविड हेडलीचा राइटहॅण्ड होता. कंट्रोल रुममध्ये जो माणूस बसलेला तो तहव्वुर राणाच होता असं म्हटलं जातं. मुंबई हल्ल्यातील दोषी राणा भारतात आल्यानंतर तपास यंत्रणांना 26/11 हल्ल्याच्या कारस्थानाबाबत बरीच माहिती मिळू शकते. कोणाची काय भूमिका होती? कोण-कोण या कटात सहभागी होते, ते स्पष्ट होईल. अनेक नावं अजून समोर आलेली नाहीत, तहव्वुर राणाच्या चौकशीतून ती माहिती मिळू शकते.

अमेरिकेत त्याला अटक कधी झालेली?

भारताने अमेरिकन कोर्टात मजबूत पुरावे सादर केले. यात राणाचा सहभाग स्पष्ट झाला. राणाला 2009 साली शिकागो येथून अटक करण्यात आली होती. FBI ने त्याला अरेस्ट केली होती. राणा हा पाकिस्तानी ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेटिव आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.