अखेर अमेरिकेने भारतासमोर टेकले गुडघे, थेट स्विकारला पराभव, म्हटले, भारताला इतके..
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने भारतासोबतचे व्यापार करार करण्यावर पुन्हा लक्ष केंद्रित केले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार रखडले आहेत. त्याचे कारण म्हणजे भारत काही मुद्द्यावर ठाम आहे. ज्यामुळे ही डिल पुढे जाऊ शकत नाही.

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. त्यानंतर कमी कमी करत भारतावरील टॅरिफ कमी केला. पण भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे घोंगडे तसेच भिजत आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार काही पूर्ण होत नाही. काही दिवसांपूर्वी व्यापार करार पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर डिल फिसकटल्याचे बघायला मिळाले. भारतावर व्यापार करण्याकरिता अमेरिकेचा मोठा दबाव आहे. जर व्यापार करार झाले नाही तर भारताला परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही अमेरिकेने म्हटले. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय मार्केट खुले हवे आहे. मात्र, भारत आपल्या भूमिकांवर ठाम आहे. भारतासाठी त्यांचे शेतकरी आणि त्यांचा माल सर्वात अगोदर आहे. भारत आणि अमेरिका व्यापार करारात भारताचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी भारताकडून घेतली जात आहे. जर हे व्यापार करार झाले, भारतीय मालाला भाव मिळणार नसल्याचा अंदाज आहे. यामुळे दोन्ही देशातील व्यापार करार होऊ शकत नाहीत.
आता भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार कराराबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार करारात अमेरिकेने मान्य केले की, भारताला कृषी क्षेत्रात राजी करणे सोपे नाही. अमेरिकी ट्रेड रिप्रेजेंटेटिव्ह जेमीसन ग्रीर यांनी नुकताच मोठे विधान केले. जेमीसन ग्रीर यांनी म्हटले की, भारत कायमच आपल्या कृषी क्षेत्राचे रक्षण करतो. तो पुढेही करत राहणार. त्यांचे हे विधान अशावेळी आले, ज्यावेळी त्यांची टीम व्यापार करार करण्यासाठी भारतात आली होती.
गेल्या सहा महिन्यांनंतर पहिली बैठक भारत आणि अमेरिका व्यापार करारात झाली. गेल्या काही महिन्यांपासून व्यापार करार करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, आपल्या कृषी क्षेत्राला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही, याची काळजी भारताकडून घेतली जात आहे. अमेरिकेला आपले सोयाबीन भारताच्या मार्केटमध्ये आयात करायचे आहे. मात्र, भारतातील शेतकरी अगोदरच मोठ्या संख्येने सोयाबीनचे उत्पादन घेतात.
जर भविष्यात अमेरिकेचे सोयाबीन भारतीय बाजारपेठेत दाखल झाले तर स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज आहे. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले. या टॅरिफनंतर होणारे नुकसान भरून काढण्यासाठी विविध देशांसोबत भारताने मोठे व्यापार करार केले.