अमेरिकेतून युद्धात सर्वात मोठी घोषणा, जगात हाहाकार, भारताला दणका, थेट इराण आणि रशिया..
इराण आणि अमेरिका युद्धात जगातील जवळपास सर्वच देश भरडले जात आहेत. त्यामध्येच आता अमेरिकेने जगाची झोप उडवणारी घोषणा केली. या घोषणाने खळबळ उडाली. भारताला मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट आहे. यामधून भारत मार्ग कसा काढतो, हे पाहण्यासारखे ठरेल.

इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेनंतरही जगाची धडधड वाढली आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. होर्मुज खाडीत अमेरिकेकडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे एक वेगळे संकट ओढावले आहे. यामध्येच आता अमेरिकेने भारताला मोठा दणका दिला. अमेरिकेच्या निर्णयाने भारताची झोप उडाली. यामुळे युद्धाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर जगावर होणार. अमेरिका आता भारताला रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी देणारी तेल सवलत नूतनीकरण करणार नाही. हा भारतासाठी अत्यंत मोठा झटका म्हणावा लागेल. इराण आणि अमेरिका युद्धातमुळे जगात तेलाच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला.
ज्यामुळे हा तुटवडा भरून काढण्याकरिता रशिया आणि इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी परवानगी देणारी निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. मात्र, आता ही सूट वाढवली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. ही माहिती अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांनी दिली. स्कॉट बेसेन्ट यांनी केलेल्या घोषणेनंतर पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढले. स्कॉट बेसेन्ट यांनी म्हटले की, इराणच्या तेलावरील सागरी निर्बंधांमधील सूट वाढवणार नाही.
ही सूट याच आठवड्यात संपणार आहे. रशियाच्या तेलावरीलही सूट याच आठवड्यात संपणार आहे. निर्बंध शिथिल करून तेलपुरवठा वाढवण्याचे आणि जागतिक ऊर्जा किमती कमी करण्याचे प्रयत्न अमेरिकेचे होते. मात्र, आता पुन्हा एकदा कठोर भूमिकेत अमेरिका आहे. अजून युद्ध थांबलेही नाही. या निर्णयाचा भारताला फटका बसणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशात गॅस आणि तेलाचा मोठा तुटवडा आहे.
भारताला या काळात रशियाने साथ दिली. रशियातून भारतात मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा केला जात आहे. ज्यामुळे इतक्या भयंकर परिस्थितीमध्येही भारतात कच्च्या तेलाची कोणतीही समस्या नाही. पण आता अमेरिकेकडून निर्बंध घातली जात आहेत, त्याला मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे भारत थेटपण रशियाकडून तेल खरेदी करू शकणार नाही. या काळात भारताने रशियाकडून तेल खरेदी केली नाही तर भारतात स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. अमेरिकेने रशियासोबतच इराणच्या तेलावर निर्बंध घातले आहेत.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आला होता. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मुदतवाढ अमेरिका देणार नाही. ज्यामुळे ऐन युद्धात समस्या वाढणार हे स्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने रशियन तेलावर दिलेली सवलत लागू झाल्यानंतर भारताने रशियाकडून अंदाजे 30 दशलक्ष बॅरल तेलाची मागणी केली आहे. भारताला आता रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करता येणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात जगातील काही देश भूमिका घेण्याची शक्यता आहे.