लोकप्रिय उद्योजकाच्या एकुलत्या एका मुलाचं निधन… आता 35,000 कोटींचा मालकी हक्क कोणाकडे जाणार? मोठी माहिती समोर
गडगंज श्रीमंत उद्योजकाच्या एकुलता एक मुलाचं परदेशात निधन... कुटुंबावर दुःखाचा डोंगर... आता 35,000 कोटींचा मालकी हक्क कोणाकडे जाणार? 75% संपत्तीचं काय होणार? मोठी माहिती समोर

देशाचे दिग्गज उद्योजकांच्या यादीतील अव्वल वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 2026 वर्षाच्या सुरुवातील त्यांनी एकुलत्या एका मुलाला गमावलं आहे. अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या निधनानंतर आता संपत्तीचं काय होणार अशा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. आता त्यांचा मुलगा हयात नाही, तर त्यांचा व्यवसाय पुढे नेण्याची मोठी जबाबदारी कोण घेईल? याबद्दल माहिती समोर आली आहे.
मुलगी प्रिया अग्रवाल यांच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी
अनिल अग्रवाल यांची मुलगी प्रिया अग्रवाल सध्या Vedanta आणि Hindustan Zinc च्या बोर्डमध्या समिल आहे. हिंदुस्तान झिंक कंपनीच्या अध्यक्षा म्हणून त्या जबाबदारी सांभाळत आहे. व्यवसायात त्यांची मजबूत पकड असल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि येणाऱ्या काळात वेदांताची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर राहण्याची अपेक्षा आहे.
अनिल अग्रवाल यांच्या एकून संपत्ती किती?
भंगार विक्रेता म्हणून आपला प्रवास सुरू करणारे अनिल अग्रवाल आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. फोर्ब्स (Forbes) च्या ताज्या रिपोर्टनुसार, अनिल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती जवळपास 4.2 अब्ज डॉरल म्हणजे जवळपास 35 हजार कोटी रुपये आहे.
75 % संपत्ती दान करण्याचा संकल्प
गंडगंज संपत्तीचे मालक असून देखील अनिल अग्रवाल त्यांच्या साध्या आणि उदार स्वभावासाठी ओळखले जातात. “Giving Pledge” अंतर्गत त्यांनी त्यांच्या संपत्तीपैकी 75 % सामाजिक कार्यासाठी दान करण्याचं वचन दिलं आहे. अनिल अग्रवाल यांनी आधीच जाहीर केलं आहे की ते त्यांच्या कमाईतील 75 % सामाजिक कार्यासाठी समर्पित करतील.
अशात मुलाच्या निधनानंतर ते भावनिक झाले आणि म्हणाले की आता ते अधिक साधे जीवन जगतील आणि अग्निवेशची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी समाजसेवेचं काम अधिक वेगाने पुढे नेतील. अग्निवेश यांचे स्वप्न होतं की, देशातील एकाही मुलाला उपाशी झोपू देणार आणि प्रत्येक तरुणाला काम मिळावं, या संकल्पाने अग्रवाल कुटुंब आता पुढे जाणार आहे… असं देखील अनिल अग्रवाल म्हणाले.
