Donald Trump Warns Venezuela : व्हेनेझुएलावर पुन्हा चढवणार हल्ला ? ट्रम्प यांनी ठणकावलं; मोठा इशारा देत म्हणाले..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे. मादुरोला ताब्यात घेतल्यानंतरही शांत न होता, ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारला अटी मान्य न केल्यास दुसऱ्या लष्करी हल्ल्याचा थेट इशारा दिला आहे. अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण हवे आहे. ट्रम्प यांच्या मते, व्हेनेझुएला 'मृत देश' बनला असून तो सुधारण्यासाठी अमेरिकेचा हस्तक्षेप आवश्यक आहे.

व्हेनेझुएलाला टार्गेट करत अमेरिकेने त्यांचे राष्ट्रपती निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना ताब्यात घेतलं. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच शांत झालेलं नसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्हेनेझुएलासंदर्भात पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली आहे. (व्हेनेझुएलाच्या) तेथील अंतरिम सरकारने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत तर अमेरिका दुसरा लष्करी हल्ला चढवेल, असा थेट इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेने सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे, पण व्हेनेझुएलाला ‘ठीक करण्याची’ वेळ आली तर आम्ही पुन्हा कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही असंही ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलं.
आता परिस्थिती आमच्या कंट्रोलमध्ये..
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेमुळे अमेरिकेची भूमिका अधिक मजबूत झाली आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तेथील परिस्थितीवर आता अमेरिकेचा प्रभाव आहे असाही दावा त्यांनी केला. ‘तिथे कोण जबाबदार आहे हे मला विचारू नका, कारण माझ्या उत्तरामुळे वाद निर्माण होईल,’ असं ट्रम्प पुढे म्हणाले. पण तेथील परिस्थितीवर अमेरिकेचा पूर्ण कंट्लरोल असल्याचा पुनरुच्चारही ट्रम्प यांनी केला.
दुसऱ्या हल्ल्याची तयारी ?
गेल्या आठवड्यात अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला चढवला. मात्र अमेरिका दुसऱ्या लष्करी हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार होती, असंही ट्रम्प यांनी सांगितले. “आम्ही दुसऱ्या हल्ल्यासाठी तयार होतो, सर्व काही निश्चित झालं होतं, परंतु सध्या त्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटत नाही” असंही ट्रम्प यांनी नमूद केल. जर तेथील परिस्थिती सुधारली नाही तर दुसरा हल्ला करण्याचा पर्याय खुला आहे, असंही ते म्हणाले.
ऑपरेशनमध्ये हेलिकॉप्टरचे नुकसान
याकारवाईदरम्यान एका अमेरिकन हेलिकॉप्टरचे गंभीर नुकसान झाले आहे असं ट्रम्प म्हणाले. मात्र सर्व अमेरिकन सैनिक सुरक्षित आहेत आणि कोणाचाही मृत्यू झालेल नसल्याचही त्यांनी लगेच स्पष्ट केलं. जखमी सैनिकांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे.
मरा हुआ देश
अचानक हल्ला चढवलेला व्हेनेझुएला हा “सध्या एक मृत देश” असे ट्रम्प यांनी म्हटलं आणि वर्षानुवर्षे चाललेल्या वाईट धोरणांमुळे आणि कमकुवत प्रशासनामुळे देश उद्ध्वस्त झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.व्हेनेझुएलामध्ये तेलाचे उत्पादन खूपच कमी आहे आणि अमेरिकेला त्याच्या तेल आणि इतर संसाधनांमध्ये पूर्ण प्रवेश मिळाला पाहिजे असंही ते म्हणाले.
ट्रम्प यांनी इराण सरकारलाही थेट इशारा दिला आहे. ट्रुथसोशलवरील एका पोस्टमध्ये त्यांनी इराणमध्ये निदर्शने करणाऱ्यांना, पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. भूतकाळात जे घडलं, इराणे तसं जर निदर्शकांना मारण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका जोरदार प्रत्युत्तर देईल असं ट्रम्प यांनी ठणकावलं.
व्हेनेझुएलाच्या तेल पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं.अमेरिकन तेल कंपन्या तसे करण्यास तयार असल्याचा दावाही त्यांनी केला.व्हेनेझुएलाच्या तेल पायाभूत सुविधा सुरुवातीला अमेरिकन कंपन्यांनी बांधल्या होत्या, ज्या नंतर त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या असं ट्रम्प म्हणाले.
