पोलिसांवर भीषण हल्ले, अनेक स्टेशनला आग, ब्रिटनच्या अनेक शहरांमध्ये का भडकली हिंसा

Violence in Britain : ब्रिटेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसा भडकली आहे. शनिवारी तर गोऱ्या साहेबांच्या देशात जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला तर अनेक पोलीस ठाण्यांना आग लावली. दोन समुदायात मोठी तेढ निर्माण झाली आहे.

पोलिसांवर भीषण हल्ले, अनेक स्टेशनला आग, ब्रिटनच्या अनेक शहरांमध्ये का भडकली हिंसा
ब्रिटनमध्ये हिसेंचे लोण, पोलिसांना केले लक्ष्य
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 9:58 AM

ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलांवरील हल्ले वाढले आहे. त्यामुळे दोन समुदायात तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही समुदाय एकमेकांसमोर आले आहेत. शनिवारी 3 ऑगस्ट रोजी तर हिंसक जमावाने पोलिसांवर दगड, विटांचा मारा केला. अनेक शहरात पोलीस स्टेशनला आग लावण्याच्या घटना वाढल्या. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये तीन पोलीस जखमी झाले आहेत.

सोशल मीडियाने आगीत ओतले तेल

इंग्लंडमधील 15 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर उतरली आहे. तर काही आंदोलकांनी हिंसक प्रदर्शन केले आहे. इंग्लंडच्या साऊथपोर्ट या भागात सर्वाधिक हिंसा झाली. काही दिवसांपूर्वी 17 वर्षांच्या तरुणाने 3 लहान मुलांना चाकुने भोसकल्याची घटना घडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. चाकू भोसकणारा आरोपी हा इस्लामिक जिहादी गटाशी संबंधित असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर हिंसा भडकली.

हे सुद्धा वाचा

नागरिकांचा पोलिसांवर हल्ला

साऊथ पोर्टमधील सुंदरलँडमध्ये नागरिकांनी उग्र प्रदर्शन केले. आंदोलकांनी पोलिसांना आणि पोलीस ठाण्यांना लक्ष्य केल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. पोलीस नियंत्रणाबाहेर जायला लागल्याचे लक्षात येताच अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. आंदोलकांच्या हाती ब्रिटनचा ध्वज होता. आंदोलकांना पुढे जाण्यापासून मज्जाव केल्यानंतर आंदोलक हिंसक झाले होते.

आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. संतप्त आंदोलकांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना मारहाण केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यात तीन पोलीस गंभीर जखमी झाले. याप्रकरणात अतिरिक्त कुमक आल्यानंतर पोलिसांनी 8 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

का घडले इतके उग्र आंदोलन

इंग्लंडमधील लिव्हरपूल जवळील साऊथपोर्ट भागात 29 जुलै रोजी एका 17 वर्षीय मुलाने लोकांवर चाकू हल्ला चढवला. त्याने तीन लहान मुलांना भोसकले. या हल्ल्यात लिस डेसिल्वा अगुइर (9 वर्ष), एल्सी डॉट स्टॅनकॉम्ब (7 वर्ष) आणि बेबे किंग (6 वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. सोशल मीडियावर त्यानंतर अफवा पसरली की आरोपी हा इस्लामिक जिहादी गटाचा सदस्य आहे. त्यानंतर जवळच असलेल्या मशि‍दीसमोर आंदोलकांनी विरोधी नारे दिले.

पोलिसांनी आरोपी रुदाकुबाना याला अटक केली आहे. हा 17 वर्षीय तरुण कार्डिफ, वेल्स येथील रहिवाशी आहे. त्याने हे कृत्य का केले, त्यामागील कारणांचा पोलीस शोध घेत आहे. पण तोपर्यंत हळूहळून ब्रिटेनमध्ये हिंसेचे लोण पसरले.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.