अतिरेक्यांच्या गोळीबारात आईचा मृत्यू, आता ज्या रेंजरने वाचवलं, त्याच्याच कुशीत जीव सोडला, रवांडाच्या प्रसिद्ध गोरील्लाचा मृत्यू

ज्या रेंजरने तिला शिकाऱ्यांच्या तावडीतून सोडवलं आणि मोठं केलं, त्याच रेंजरच्या मांडीवर या गोरील्लाने जीव सोडला. सध्या नदकासी आणि या रेंजरचा हा भावनिक फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.

अतिरेक्यांच्या गोळीबारात आईचा मृत्यू, आता ज्या रेंजरने वाचवलं, त्याच्याच कुशीत जीव सोडला, रवांडाच्या प्रसिद्ध गोरील्लाचा मृत्यू
ज्या रेंजरने तिला शिकाऱ्यांच्या तावडीतून सोडवलं आणि मोठं केलं, त्याच रेंजरच्या मांडीवर या गोरील्लाने जीव सोडला.
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 3:54 PM

आफ्रिकेच्या पूर्वेला (East Africa) एक देश आहे, नाव रवांडा, (Rwanda) याच देशाच्या अतिदुर्गम डोंगरदऱ्यातील (Virunga Mountains) विरुंगा नॅशनल पार्कमधून आज एक दु:खद बातमी समोर आली आहे. इथं गेल्या 14 वर्षांपासून राहणारी नदकासी नावाच्या गोरील्ला मादीचं निधन झालं आहे.जगभरात रवांडाची ओळख म्हणून नदकासीकडे (Ndakasi) पाहिलं जायचं. विशेष म्हणजे, ज्या रेंजरने तिला शिकाऱ्यांच्या तावडीतून सोडवलं आणि मोठं केलं, त्याच रेंजरच्या मांडीवर या गोरील्लाने जीव सोडला. सध्या नदकासी आणि या रेंजरचा हा भावनिक फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. ( viral-emotional-photo-gorilla-ndakasi-who-got-famous-for-his-selfie-with-park-ranger-died-Virunga-National-park-share-photos-rwanda )

2007 ची गोष्ट. या नॅशनल पार्कचे रेंज मॅथ्यू शामवू (Mathieu Shamavu) आणि आंद्रे बाऊमा (Andre Bauma) यांनी नदकासी या गोरील्लाला विद्रोह्यांच्या तावडीतून सोडवलं होतं. तिच्या आईला या विद्रोही गटाने गोळी घातली होती. तेव्हा नदकासी फक्त 2 महिन्याची होती, आणि आपल्या आईच्या शरीराला कवटाळून बसलेली होती. अशा परिस्थितीत या 2 रेंजरने तिला नॅशनल पार्कमध्ये आणलं.

आज ही दुखद घडल्याची माहिती Virunga National Park ने आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर करत दिली. यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं, ” अत्यंत दुखद घटना घडली आहे, विरुंगाची प्रिय गोरील्ला नदकासीचा मृत्यू झाला आहे. तिच्या शेवटच्या घटका मोजत असताना नदकासी तिचा मित्र रेंजर आंद्रे बाऊमाच्या कुशीत होती, ज्याने तिला लहानपणी रेस्क्यु केलं होतं.”

नॅशनल पार्कने दिलेल्या माहितीनुसार, नदकासी गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होती, तिचं आजारपण वाढतच गेलं, आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. रेंजरने हा फोटो शेअर करत लिहलं की, नदकासीसोबत राहिल्यानंतर माकडांचं वागणं कसं असतं, हे समजण्यास मोठी मदत झाली.

हेही वाचा:

Know This: अशी आई, जी बाळाला दूध पाजते आणि मरते, बाळांचं पोट भरण्यासाठी मृत्यूला कवटाळणारी आई

Video: कुत्र्यापासून वाचण्यासाठी भाऊ थेट कारच्या टपावर, नेटकरी म्हणाले, “याच्यावर चिडताही येणार नाही!”